IPL 2020 : फलंदाजांच्या गर्दीने तुषार झाला गोलंदाज

संजय घारपुरे
Friday, 16 October 2020

युवा देशपांडेची क्रिकेटची पॅशन जबरदस्त आहे. तो गुणवान आहे आणि यशासाठी आसुसलेला आहे. तो पहिलाच सामना खेळत होता, पण ते कुठेही जाणवले नाही. त्याने योग्य मेहनत घेतली तर तो भविष्यात भारताचा आधारस्तंभ होऊ शकेल.
 

मुंबई : आयपीएलमधील तुषार देशपांडेच्या कामगिरीची चांगलीच चर्चा होत आहे. पण त्याच्या क्रिकेट कारकीर्दीस खरे वळण शिवाजी पार्कवरील चाचणीच्यावेळी फलंदाजांची खूपच गर्दी असल्यामुळे लागले. शिवाजी पार्कमधील चाचणीसाठी मी कल्याणमधील तीन-चार जणांसह गेलो होतो. त्यावेळी वीस-पंचवीस मुलांनी पॅड बांधलेले होते आणि 40-45 मुले फलंदाजीसाठी रांगेत होती. गोलंदाजांच्या रांगेत 15-20 जणच होते. त्यावेळी साडेतीन वाजले होते. साडेसहापर्यंतच चाचणी होती. चाचणीसाठी आलो आहोत. चाचणी देऊनच जायची, असे ठरवून गोलंदाजांच्या रांगेत उभा राहिलो, तुषार या चाचणीची आठवण सांगतो.

मी त्या चाचणीपूर्वी मला कोणीही माझ्या वयोगटातील मुलांपेक्षा मी जास्त वेगात चेंडू टाकतो, असे सांगितले नव्हते. त्या चाचणीच्यावेळी मला सुदैवाने नवा चेंडू मिळाला. माझे बूट साधे रबरी होते, पण त्याचा मी विचार केला नाही. पहिलाच चेंडू टाकला तो बनाना आऊट स्विंग होता. तो टप्प्पा पडल्यावर किकही झाला होता. ते पाहून पॅडीसर म्हणाले, असलेच चेंडू परत टाक, माझे सहा-सात चेंडू पाहून माोझी शिबिरासाठी निवड झाली, ही आठवण त्याने सांगितली होती. 

विराट कोहलीची 'पांढरी' अंधश्रद्धा

दिल्ली संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि तुषार देशपांडे हे शिवाजी पार्क जिमखान्यात एकमेकांचे सहकारी होते. आमची घट्ट मैत्री नसली तरी आम्हाला एकमेकांबद्दल आदर आहे. तो फलंदाज तर मी गोलंदाज. एकमेकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आमच्यात पैजही लागत असे, असेही तुषार म्हणाला होता. 

गतवर्षी आयपीएलही हुकली
गतवर्षी तुषारला पंजाबने चाचणीसाठी बोलावले होते. पण दोन आठवड्यांतच रणजी मोसम सुरू होणार होता, त्यामुळे तुषारने आयपीएल चाचणीऐवजी रणजी स्पर्धेपूर्वी होणारी पोलिस ढाल स्पर्धा खेळण्याचे ठरवले. या स्पर्धेत खेळताना तुषारला दुखापत झाली .

IPL 2020 : अय्यरच्या खांदा दुखापतीने दिल्लीला चिंता

युवा देशपांडेची क्रिकेटची पॅशन जबरदस्त आहे. तो गुणवान आहे आणि यशासाठी आसुसलेला आहे. तो पहिलाच सामना खेळत होता, पण ते कुठेही जाणवले नाही. त्याने योग्य मेहनत घेतली तर तो भविष्यात भारताचा आधारस्तंभ होऊ शकेल.
- किगीसो रबाडा

तुषार देशपांडेने अचूक दिशा आणि टप्प्यावर मारा केला. त्याहीपेक्षा त्याने दाखवलेली जिगर जबरदस्त होती. 
- शिखर धवन, दिल्लीचा प्रभारी कर्णधार.

तुषारचा प्रतिकार
आयपीएल पदार्पणातच तुषारला पहिले षटक देण्यात आले. त्याच्या या षटकात बेन स्टोक्‍सने 11 धावा वसूल केल्या, पण तुषारने डावाच्या अकराव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर स्टोक्‍सचा अडथळा दूर केला. एवढेच नव्हे तर तुषारने राहुल तेवतियास अखेरच्या षटकात रोखले.


​ ​

संबंधित बातम्या