नातेवाईकाचा हल्ल्यात मृत्यू झाल्यामुळे रैनाची IPL मधून माघार?

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 29 August 2020

19 ऑगस्टच्या मध्यरात्री अडीचच्या सुमारास थरियाल गावात वास्तव्यास असलेल्या सरकारी ठेकेदार अशोक कुमार यांच्या घरावर टवाळखोरांनी हल्ला केला.

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जचा हुकमी एक्का सुरेश रैनाने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याने कोणत्या कारणास्तव हा निर्णय घेतला हे अद्याप गुलदस्त्यात असताना त्याच्या नातेवाईकाचा घरफोडी करणाऱ्या टवाळखोरांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. नऊ दिवसांपूर्वी 19-20 ऑगस्ट दरम्यान रात्रीच्या वेळी पठाणकोटमधील थरियाल गावात टवाळखोरांनी एका सरकारी ठेकेदाराची हत्या करुन एका व्यक्तीची लुटपाट केली होती. ही व्यक्ती सुरेश रैनाच्या आत्याचा पती असल्याचे समोर येत आहे.

IPL 2020: CSK ला आणखी एक धक्का, धोनीची साथ सोडून रैना मायदेशी परतला

टवाळखोरांनी केलेल्या हल्ल्यात रैनाची आत्या आणि त्याचा आते भाऊ देखील गंभीर जखमी झाले असल्याचे समजते.  संबंधित घटना क्रिकेटर सुरेश रैनाच्या नातेवाईकांशी संबंधित असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेत मायदेशी परतला आहे. या घटनेमुळेच त्याने स्पर्धेतून माघार घेतल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स सध्या रैनाच्या कुटुंबियाशी पाठिशी ठाम उभी आहे.  

IPL 2020 : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचे गडी अडकले कोरोनाच्या जाळ्यात

19 ऑगस्टच्या रात्री झाला होता हल्ला 

19 ऑगस्टच्या मध्यरात्री अडीचच्या सुमारास थरियाल गावात वास्तव्यास असलेल्या सरकारी ठेकेदार अशोक कुमार यांच्या घरावर टवाळखोरांनी हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छतावरुन घरात शिरलेल्या टोळीने बेसबॉल स्टीक, लोखंडी रॉडने रैनाचे काका आणि त्यांच्या कुटुंबियावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी घरातील दागिने आणि रोकड लंपास केली. सकाळी दूधवाला घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी प्रभजोत यांनी संबंधित कुटुंबिय रैनाचे नातेवाईक असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. 


​ ​

संबंधित बातम्या