'आयजीच्या जीवावर बायजी उदार' नाही चालतं हेच शाहरुखच्या गड्यांनी अनुभवलं

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 3 November 2020

कोलकाता नाईट रायडर्सला सनरायझर्स हैदराबादपेक्षा अधिक संधी होती. ते त्यांच्या एक पाउल पुढे होते. पण त्यांनी अखेरच्या टप्प्यात आपली खराब कामगिरी कायम ठेवली. परिणामी त्यांच्यावर आपले सामने संपल्यानंतर 14 गुण मिळवून मुंबईच्या विजयावर अवलंबून रहावे लागले. सनरायझर्सने मुंबईला नमवून 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' या म्हणीला साजेशा परिस्थितीत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला दणका दिला. त्यांच्या विजयाने कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.  

मुंबई इंडियन्सन दिलेल्या 150 धावांचे आव्हान सहज परतवून लावत  डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के केले. त्यांच्या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ आता 6 नोव्हेबरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध एलिमेनटरचा सामना खेळेल. या सामन्यात बाजी मारून क्वॉलिफाय दोनमध्ये कोणता संघ प्रवेश करणार हे निश्चित होईल. 

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात साखळी फेरीतील अखेरचा सामना झाला. सनरायझर्सने हा सामना जिंकत 14 पैकी 7 सामन्यातील विजयासह 14 गुण मिळवले. रॉयल चलेंजर्स बंगळुरु संघ आणि कोलकाता नाईट रायडर्सने देखील एवढेच सामने जिंकले आहेत. मुंबईने यापूर्वी पात्रता सिद्ध केली होती. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात विजय मिळवत दिल्लीनं पात्रता सिद्ध केली. तर या सामन्यातील पराभवानंतरही केकेआरपेक्षा अधिक रनरेट असल्यामुळे विराटच्या संघाचे टेन्शन कमी झाले.  

हेल्मेट सक्ती काळाची गरज; सचिनचा आयसीसीला सल्ला

मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात मुंबईने विजय मिळवला तरच कोलकाताला प्ले ऑफमध्ये खेळण्याची संधी मिळणार होती. पण मुंबई इंडियन्सने प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देत या सामन्यात उतरुन कोलकाताच्या आशेवर पाणी फिरवले. मागील काही सामन्यात  दुखापतीमुळे बाहेर असलेला रोहित शर्मा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मैदानात उतरला. पण त्याला फार मोठी खेळी करता आली नाही. 

डिप्रेशनमुळे दिग्गज खेळाडू हॉस्पिटलमध्ये

कोलकाता नाईट रायडर्सला सनरायझर्स हैदराबादपेक्षा अधिक संधी होती. यंदाच्या हंगामात ते हैदराबादपेक्षा  एक पाउल पुढे होते. पण त्यांनी अखेरच्या टप्प्यात आपली खराब कामगिरी कायम ठेवली. परिणामी त्यांच्यावर आपले सामने संपल्यानंतर 14 गुण मिळवून दुसऱ्या दोन संघातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहण्याची वेळ आली. सनरायझर्सने मुंबईला नमवून 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' या म्हणीला साजेशा परिस्थितीत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला दणका दिला. मुंबईला सहज पराभूत करत सनरायझर्स हैदराबादने कोलकाताला बाद करत आव्हान कायम ठेवले.  


​ ​

संबंधित बातम्या