रिषभ पंत : जो जिता वही सिकंदर!

रविराज गायकवाड
Tuesday, 19 January 2021

'पंत काही सुधारणार नाही. तो जसा खेळतो. त्याला तसं स्वीकारावं लागेल. मानावं लागेल.' मौहम्मद कैफनं काही दिवसांपूर्वी असं मत व्यक्त केलं होतं. आज, मैदानावर पंत होतातो कसा खेळेल? खरचं मॅच जिंकून देईल का?

Rishabh Pant hero for Team India  तुम्हाला. जो जिता वही सिकंदरमधला संजू आठवतोय? हा तोच तो. एकदम वाया गेलेला. कोणाचं न ऐकणारा. ज्याच्याविषयी, सगळ्यांचं मत खूप वाईट असतं. पण, शेवटच्या क्षणी तो सायकल रेस जिंकतो आणि सगळे त्याला डोक्यावर घेतात. आज रिषभ पंतचा संजू झालाय. ऑस्ट्रेलिया विरुद्धची चौथी टेस्ट आपण जिंकणार की ड्रॉ करणार, हे कोणीच सांगू शकत नव्हतं. मैदानावर पुजारा अक्षरशः नांगर टाकू बसला होता. पण, तो मॅच जिंकून देईल, असं कुणाला वाटत नव्हतं. मॅच जिंकून दिली तर, तो पंतच जिंकून देईल, असं प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याचं मत झालं होतं. यापूर्वी कधीही त्याच्यावर कोणी एवढा विश्वास टाकला नव्हता. आज दिवसच त्याचा होता. त्यानं मॅच जिंकून दिली आणि त्याला पाण्यात बघणाऱ्यांनाही त्याचं कौतुक करावसं वाटलं. 

पंत विषयी मत बदला 

'पंत काही सुधारणार नाही. तो जसा खेळतो. त्याला तसं स्वीकारावं लागेल. मानावं लागेल.' मौहम्मद कैफनं काही दिवसांपूर्वी असं मत व्यक्त केलं होतं. आज, मैदानावर पंत होतातो कसा खेळेल? खरचं मॅच जिंकून देईल का? याविषयी कोणालाच काही खात्री देता येत नव्हती. पण, कैफचं ते मत आठवलं आणि पंतला स्वीकारून केवळ त्याचा खेळ पाहत रहावासा वाटला. मॅच जिंकल्यानंतर मैदानावर राऊंड मारून, टीम इंडियानं चाहत्यांचं कौतुक स्वीकारलं. त्यावेळी तिरंगा पंतच्या हातात होता. त्यावेळी हा तोच पंत आहे की ज्याच्यावर मीडिया सकट सगळ्यांनी भरभरून टीका केली होती. 'तो सिरिअस नाही,  बेजबाबदार आहे. त्याच्यावर तुम्ही विश्वास टाकू शकत नाही.' अशी बरीच टीका. पंतनं पचवली, सहन केली.

Aus vs Ind , 4th Test : अजिंक्य सेनेनं अभिमानाने मिरवला तिरंगा; पाहा ऐतिहासिक क्षणाचे खास फोटो

आज कदाचित त्याच्यावर टीका करणाऱ्यांचं मत बदललं असावं. मध्यंतरी सुनंदन लेले यांच्याशी बोलता बोलता रिषभ पंतचा विषय निघाला होता. मी विचारलं, 'सर पंतचा काय प्रॉब्लेम आहे?' त्यावर लेलेसर म्हणाले, 'पोरगं चांगलं आहे. त्यात काही शंका नाही. पण, त्याची निवड करून चूक झालीय, असं समितीला वाटतं. आता ही चूक पुढं रेटायचं सुरू आहे.' पंतला निवडणं चूक आहे की, नाही हे तज्ज्ञ ठरवतीलच. आज, त्याला संधी मिळाली आणि त्यानं त्याचं चीज केलं, हे मात्र निश्चित. 

अपेक्षांचं ओझं 

एक काळ असा होता, भारताला चांगला विकेट कीपर नव्हता. साबा करीम, विजय दहीया, समीर दीघे, दीप दासगुप्ता, अजय रात्रा, असे अनेक विकेटकीपर भारतानं ट्राय केले. त्यात यादीत पार्थिव पटेल आणि दिनेश कार्तिक यांच्याकडून तर खूप अपेक्षा होत्या. त्या फेल ठरल्या. मग, आला माही. त्याच्यासारखा विकेट कीपर भारतालाच काय तर, इतर कोणत्याही क्रिकेट टीमला मिळाला नाही. अगदी गिलख्रिस्ट, संगकाराही त्याच्यापुढं फिके आहेत. माही रिटायर झाल्यानंतर टीम इंडियात खूप मोठी पोकळी निर्माण होण्याची भीती होती. या भीतीचं अनावश्यक ओझं. पंतला सहन करावं लागलं. तेही वयाच्या विशीत असताना. त्यामुळं 2018पासून कसोटी खेळत असलेला पंत कधी चमकला तर कधी झाकोळला गेला. 2019च्या वर्ल्ड कपला टीम इंडियात त्याला स्थान मिळालं. अगदी सेमीफायनलमध्ये त्यानं टीमला विजय मिळवून द्यावा, एवढी मोठी अपेक्षा त्यादिवशी त्याच्याकडून व्यक्त होत होती.

Australian Open : 72 खेळाडू लॉकडाऊनमध्ये, रुममध्येच सुरुय ग्रँडस्लॅम जिंकण्याची तयारी

भावनेच्या भरात ती अपेक्षाही मान्य करू. पण, म्हणून तो वाईटच होता किंवा आहे, असं म्हणणं अतिशयोक्ती होती. आज तर रिषभ पंतनं सगळ्यांची तोंडं बंद केली आहेत. त्यात मीदेखील आहे. मैजानावर केवळ स्टाईल मारणारा, फार काळ टिकणार नाही, असं माझंही मत होतं. पण, रिषभनं आपण लंबी रेस के घोडे आहोत, हे त्याच्या बॅटमधून सिद्ध केलंय. मैदानावर पुजारा टीकला असता तर मॅच ड्रॉ झाली असती. पुजारा आऊट झाला आणि पंतनं मैदानावरचा गेम प्लॅनच बदलला. या सीरिजमध्ये टीम इंडियात पंतनंही खूप काही सहन केलंय. टीम पेनचं स्लेजिंग तो मागच्या दौऱ्यापासून सहन करतोय. त्याला तो मैदानावरच उत्तरही देतो. आता पंतमध्ये बॅटनं उत्तर देण्याचीही समज आलीय, असं म्हणावं लागेल.


​ ​

संबंधित बातम्या