Look Back 2020: #AllOut36 मच्छर मारण्याची AD नव्हे क्रिकेटच्या मैदानातील कहाणी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Saturday, 26 December 2020

4, 9, 2, 0, 4, 0, 8, 4, 0, 4, 1  एखादा ओटीपी किंवा आकड्यांची आदलाबदल करुन फॅन्सी मोबाईल नंबर करता येईल, अशी भारतीय गड्यांची धावसंख्या होती.

Look Back 2020, Biggest Sports Stories At 36 all out India record lowest total in a Test : चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला. अनेक देशात लॉकडाउनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागला. खेळाची मैदाने ओस पडली. क्रिकेटही याला अपवाद राहिले नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या यादीत सुरुवातीला अव्वल स्थानावर असलेल्या टीम इंडियाला यंदाचे वर्ष मुश्किलीचे गेले. भारतीय संघाने कोरोनाच्या लॉकडाउनपूर्वी न्यूझीलंड विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. ही मालिका संघाला 2-0 अशी गमवावी लागली. लॉकडाउननंतर क्रिकेटचे वेळापत्रक कोलमडले. आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याने भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट अनलॉक झाले.   

जागतिक क्रिकेट अनलॉक झाले ते इंग्लंडमध्ये रंगलेल्या यजमान साहेबांच्या (इंग्लंड) आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यानंतर. पण भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी नोव्हेंबरची वाट पाहावी लागली. युएईतील टी-20 मध्ये धमाका करुन गेलेल्या आपल्या गड्यांना 50 षटकात ताकद दाखवता आली नाही. परिणामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला वनडे मालिका 1-0 ने गमवावी लागली. टी-20 मालिका जिंकत संघाने दिमाखात कमबॅक केले. पण कसोटीत टीम इंडियाची दैना झाल्याचे अनुभवायला मिळाले.

LOOK BACK 2020: क्रिडा विश्वातील 'या' दिग्गज खेळाडूंनी घेतला जगाचा निरोप

आघाडी घेऊन टीम इंडियाच्या नावे लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. 
पिंक बॉलवरील डे नाईट सामन्यात एडलेडच्या कसोटीत भारतीय संघाने दुसरा डे नाईट कसोटी सामना खेळला. यापूर्वी मायदेशात बांगलादेश विरुद्ध ऐतिहासिक विजय नोदंवणाऱ्या टीम इंडियाची कांगारुंच्या गोलंदाजांनी चांगलीच फजिती केली. विराटने नाणेफेक जिंकल्यावर त्याच्या कर्णधारपदाच्या  नाणेफेकीच्या रेकॉर्डची चर्चा रंगली. नाणेफेक जिंकलेला सामना भारतीय संघाने गमावलेला नाही हे ते रेकॉर्ड. पहिल्यांदा बॅटिंग करुन भारतीय संघाने कशाबशा 244 धावा केल्या. एवढेच नाही तर यजमानांना 191 धावात आटोपून आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावात संघ अवघ्या 36 धावांत आटोपला. आघाडी घेऊन मॅच गमावण्याची वेळ टीम इंडियावर आली. 

4, 9, 2, 0, 4, 0, 8, 4, 0, 4, 1  एखादा ओटीपी किंवा आकड्यांची आदलाबदल करुन फॅन्सी मोबाईल नंबर करता येईल, अशी भारतीय गड्यांची धावसंख्या होती. कसोटी संघात नसलेला गब्बर शिखर धवन आणि संघात असून बाकावर बसलेला लोकेश राहुल यांची ही आठवण ही धावसंख्या पाहिल्यावर अनेकांना आली असेल. संघात घेतलेल्या एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. मयांक अग्रवालच्या 9 धावा ही सर्वोच्च धावसंख्या होती. क्रिकेटच्या इतिहासात 88 वर्षांनंतर अशी बिकट परिस्थिती एखाद्या संघावर ओढावल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाच्या नावे जमा झालेला निच्चांकी धावसंख्येचा हा रेकॉर्ड नकसो असला तरी तो आता न विसरण्यासारखा आणि वर्षाची आठवण करुन देणारा आहे, असाच आहे. क्रीडा क्षेत्रातील यंदाच्या वर्षातील ही कायम लक्षात राहिल अशीच गोष्ट आहे.  


​ ​

संबंधित बातम्या