Womens Day 2021 : लकी लेडी! मैदानात पाय ठेवताच हरमनप्रितचं शतक!

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 7 March 2021

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात तीन विकेट गमावल्यानंतर हरमनप्रितने कर्णधार मितालीसोबत भारतीय डावाला आकार दिला.

2019 मध्ये झालेल्या ICC महिला टी -20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघाला फायनलमध्ये घेऊन जाणाऱ्या हरमनप्रीतसाठी आज खास दिवस आहे. जागतिक महिला दिनाच्या आणि वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात पुनम राऊत बाद झाल्यानंतर वनडेतील उपकप्तान हरमनप्रित मैदानात उतरली. मैदानात येताच शंभर वनडे सामन्याचा विक्रम तिच्या नावे झाला. मिताली राज (210), झुलन गोस्वामी (183), अंजुम चोप्रा (127) आणि अमिता शर्मा (116) यांच्यानंतर  वनडे सामन्यात शंभरी गाठणारी हरमनप्रित पाचवी भारतीय. महिला क्रिकेटर ठरली. 

2009 मध्ये आजच्याच दिवशी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातून हरमनप्रितने वनडेत पदार्पण केले होते. 2017 च्या वर्ल्ड कपमध्ये हरमनप्रितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सिक्सर लगावला होता. तिचा सिक्सर एवढा लांब गेला होता की, या सिक्सरनंतर तिची बॅट चेक करण्यात आली होती, असा किस्सा भारत-दक्षिण अफ्रिका यांच्या सामन्यात समालोचन करणाऱ्या रिमा यांनी शेअर केला. 

Womens Day 2021 : मितालीच्या यशाचं 'राज'; स्टंम्पनं बॅटिंग आणि डान्सिंगचा फायदा

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात तीन विकेट गमावल्यानंतर हरमनप्रितने कर्णधार मितालीसोबत भारतीय डावाला आकार दिला. शंभराव्या सामन्यात मोठी खेळी करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना एक मोठा फटका खेळण्याच्या नादात हरमनप्रितने आपली विकेट गमावली. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुन लुसने तिला बाद केले. शंभराव्या सामन्यात 41 चेंडूत 40 धावा करुन हरमनप्रित बाद झाली. 

हरमनप्रित कौर ही सेहवागला आयडल मानते. तिच्या फटकेबाजीत सेहवागसारखी आक्रमकताही दिसते. टी-20 संघाचे नेतृत्व करणाऱ्या 31 वर्षीय हरमनप्रित मोठी फटकेबाजी करण्यात माहिर आहे. मिताली राजला 20 वर्षांत 2010 सामने खेळली आहे. यापूर्वी ज्या भारीतीय महिलांना वनडेत शंभरीचा टप्पा गाठला त्यांना खूप वेळ लागला. याच कारण सुरुवातीच्या काळात महिला क्रिकेट फार होत नव्हते. आता ही परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळेच हरमनप्रितने मितालीपेक्षाही कमी काळात शंभर वनडे सामने खेळले आहेत. सध्याच्या घडीला महिला क्रिकेटला मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे हरमनप्रितही क्रिकेटमधील लकी लेडी आहे, असेच म्हणावे लागेल.


​ ​

संबंधित बातम्या