माझं नाव घ्यायची काहीच गरज नव्हती; अनुष्का भडकल्यावर फारुखांची माफी
मी केवळ एकच सामना पाहायला गेले होते आणि तेव्हा मी फॅमिली बॉक्समध्ये बसले होते. पण सत्य काय आहे याने काय पडतो जेव्हा तुम्हाला तुमच्या सोयीनुसारच मतं मांडायची आहेत
नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत निवड समितीमधील सदस्य हे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पत्नीचे चहाचे कप उचलत असायचे असा धक्कादायक खुलासा माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी केल्यानंतर अनुष्काने त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. तुम्हाला निवज समितीवर टीका करायची आहे तर करा उगाच माझे नाव मध्ये ओढण्याची काहीच गरज नाही. ती भडकल्यानंतर आता फारुख इजिंनिअर यांनी तिची माफी मागितली आहे.
धक्कादायक ! 'निवड समितीतील सदस्य उचलायचे अनुष्काचे चहाचे कप'
फारुख इंजिनिअर यांनी निवड समितीवर टीका करत असताना अनुष्काचेही नाव घेतले. निवडसमितील काही सदस्य अनुष्काचे चहाचे कप उचलत असायचे अशी टीका त्यांन केली होती. यावर स्पष्टीकरण देताना तिने एक मोठी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. विश्वकरंडकात तिने केवळ एकच सामना पाहिला असून त्यातही ती फॅमिली बॉक्समध्ये बसल्याचे स्पष्ट केले आहे.
''ते म्हणाले की निवड समितीमधील सदस्य माझे चहाचे कप उचलत होते. मी केवळ एकच सामना पाहायला गेले होते आणि तेव्हा मी फॅमिली बॉक्समध्ये बसले होते. पण सत्य काय आहे याने काय पडतो जेव्हा तुम्हाला तुमच्या सोयीनुसारच मतं मांडायची आहेत,'' अशा शब्दांत तिने इंजिनिअरांना प्रत्युत्तर दिले आहे.
पिंपरीचा पठ्ठ्या होणार भारताचा सलामीवीर; भल्याभल्यांना टाकतोय मागे
— Anushka Sharma (@AnushkaSharma) October 31, 2019
ती म्हणाली, ''तुम्हाला निवड समितीवर टीका करायची आहे तर खुशाल करा पण त्यात माझे नाव ओढू नका. अशा चर्चांमध्ये माझे नाव वापरणे मला अजिबात आवडणार नाही. आणि हो मी कॉफी पिते.''
फारुख इंजिनिअर यांनी मागितली माफी
''हो, हा प्रसंग खरंच घडला होता पण, मला अनुष्कावर टीका करायची नाही. ती अत्यंत चांगली मुलगी आहे. ती आणि विराट कोहली हे रोल मॉडेल्स आहेत. तिला राग आला असले तर मी तिची माफी मागतो. मला फक्त निवड समितीशी, त्यांच्या कार्यपद्धतीशी अडचण आहे आणि विराट-अनुष्काशी नाही,'' अशा शब्दांत त्यांनी अनुष्काची माफी मागितली.
BCCIची एक चूक आणि भुवनेश्वरचे आख्खं करिेअर धोक्यात!
काय म्हणाले होते फारुख इंजिनिअर?
"विश्वचषक पाहायला मी गेलो होतो. तिथे काही व्यक्ती अनुष्का शर्माचे चहाचे कप उचलत होते. या व्यक्ती कोण होत्या हे मला माहिती नव्हते. पण कालांतराने या व्यक्ती भारताच्या राष्ट्रीय निवड समितीमधील सदस्य असल्याचे समजले."