ब्राझीलमध्ये चाललंय काय? कोरोनाचा उद्रेक आणि त्यात फुटबॉल स्पर्धा

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याच्या हेतून आसन व्यवस्थेसाठीही विशेष नियमावलीची अंमलबजावणी करावी लागणार आहे. 4 मीटरच्या चौकोनात एक व्यक्ती अशी आसन व्यवस्था ठेवावी लागेल, असेही आदेशत नमुद करण्यात आले आहे.  

रिओ दी जानेरो : कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत प्रेक्षकांशिवाय खेळ ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न सुरु असताना ब्राझीलमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ब्राझीलमधील रिओ दी जानेरोमधील फुटबॉल स्टेडियमवर प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. शहरातील महापौर मार्सेलो क्रिवेला यांनी याबाबतचे आदेश काढले असून 10 जुलैपासून प्रेक्षकांसाठी मैदान खुली करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आदेशानुसार, स्टेडियमच्या प्रेक्षक क्षमतेच्या एक तृतीयांश लोकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याच्या हेतून आसन व्यवस्थेसाठीही विशेष नियमावलीची अंमलबजावणी करावी लागणार आहे. 4 मीटरच्या चौकोनात एक व्यक्ती अशी आसन व्यवस्था ठेवावी लागेल, असेही आदेशत नमुद करण्यात आले आहे.  याशिवाय स्विमिंग पूल आणि हॉट टब व्यतिरिक्त सर्व प्रशिक्षण सुविधांच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे.  

डिएगो मॅराडोनाच्या साथीनं अर्जेंटिनाला विश्वजेता ठरवणारा मार्गदर्शक कोरोना पॉझिटिव्ह

रिओ दी जानेरो राज्यस्तरावरील फुटबॉल स्पर्धेला 18 जूनपासून सुरुवात होणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी ब्राझील फुटबॉल महासंघाने  (सीबीएफ) ब्राझीलमधील सेरी-ए चॅम्पियनशीप स्पर्धा ऑगस्टपासून सुरु करण्यास प्रयत्नशील असल्याचे म्हटले होते. यासाठी अद्याप राज्य आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मंजूरी मिळालेली नाही.  चीनच्या वुहानमधून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने युरोपातील देशात मोठे नुकसान केल्याचे पाहायला मिळाले. इटलीनंतर अमेरिका हे कोरोनाचे केंद्र बनले. त्यानंतर ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा चिंताजनकरित्या वाढताना दिसला.

'या' फुटबॉल लीगने करुन दाखवले...काय ते वाचा
 

अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येत दुसऱ्या स्थानावर पोहचले आहे. देशात दिवसागणिक कोरोनाचा आकडा वाढत असताना ब्राझील सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा जाहीर करणार नसल्याचीही भूमिका घेतली होती. त्यांच्या वेबसाईटवरुन दैनंदिनी प्रसिद्ध होणारी ही आकडेवारी काढून टाकण्यात आली होती. ब्राझीलमध्ये फुटबॉलचा थरार पुन्हा रंगण्याच्या बातम्या येत असताना फुटबॉल जगतातील आघाडीचा खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो यानेही चिंता व्यक्त केली होती. ब्राझीलमध्ये स्पर्धेचो आयोजन करणे धोक्याचे ठरेल, अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती. 


​ ​

संबंधित बातम्या