INDvsSA : त्याचा साष्टांग नमस्कार पाहून रोहितचाही तोल गेला

ज्ञानेश भुरे
Saturday, 12 October 2019

पुणे : सुरक्षा रक्षकांचे कडे तोडून मैदानात घुसणे हे क्रिकेटला काही नवे नाही. जगभरातील क्रिकेटच्या मैदानात असे अनेक प्रसंग घडले आहेत. पुणे येथील सुरू असलेल्या भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यातही असा प्रसंग घडला. मैदानात कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांच्यासारखे एकापेक्षा एक खेळाडू असताना हा चाहता प्रेक्षक गॅलरीतून मैदानात धावला.

Image may contain: 2 people, people smiling, outdoor

खासगी सुरक्षा रक्षकांचे जाळे तोडून त्याने खेळपट्टीकडे धाव घेतली. खेळाडूंच्या जवळ येऊ लागला, तसा त्याने दोन्ही हाताने खेळाडूंना फ्लाईंग किस देण्यास सुरवात केली. तो नेमके कुणाकडे  बघून हे करतोय हे समजायच्या आत हा बहाद्दर स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या रोहितजवळ येऊन पोचला आणि त्याने त्याला चक्क साष्टांग नमस्कार घातला. यथावकाश त्याच्या मागून सुरक्षा रक्षकही धावून आले आणि त्याला पकडून घेऊन गेले. चार मिनटांच्या प्रसंगाने खेळात व्यत्यय आला.

Image may contain: one or more people, baseball and outdoor

​ ​

संबंधित बातम्या