पाकिस्तानचा माजी फलंदाज नासीर जमशेदवर 10 वर्षांची बंदी

वृत्तसंस्था
Friday, 17 August 2018

पाकिस्तान सुपर लिगमधील स्पॉट-फिक्सिंगमुळे माजी फलंदाज नसीर जमशेद याच्यावर पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने दहा वर्षांची बंदी घातली आहे. जमशेदने पाकिस्तानसाठी 48 एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले आहेत. 

इस्लामाबाद : पाकिस्तान सुपर लिगमधील स्पॉट-फिक्सिंगमुळे माजी फलंदाज नसीर जमशेद याच्यावर पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने दहा वर्षांची बंदी घातली आहे. जमशेदने पाकिस्तानसाठी 48 एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले आहेत. 

जमशेदवर तपास कार्यात सहकार्य न केल्यामुळे  यापूर्वीच एक वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे. याच प्रकरणात पाकिस्तानच्या सहा खेळाडूंवर विविध काळाची बंदी घालण्यात आलेली आहे. पाच इतर खेळाडूंमध्ये शर्जेल खान, खालिद लतिफ, मोहम्मद इरफान, मोहम्मद नवाज आणि शहाजीब हसन यांचा समावेश आहे.

पाकिस्तान क्रिकेट महामंडळाचे कायदेविषयक सल्लागार तफाझूल रिझवी म्हणाले, ''नासीर जमशेदवरील अनेक आरोप सिद्ध झाले आहेत त्यामुळे त्याच्यावर 10 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे." जमशेद 2015मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडकात युनायटेड अरब अमिरातीविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.  
डिसेंबर 2016 पासून तो स्थानिक क्रिकेटमध्ये सहभाग घेतलेला नाही. 

संबंधित बातम्या