Asia Cup 2018 : भारताविरुद्ध पूर्ण तयारीनिशी उतरणार : सर्फराज

वृत्तसंस्था
Tuesday, 11 September 2018

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वीच पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने भारतीय संघाला लक्ष्य करण्यास सुरवात करत आमच्यासाठी भारताविरुद्धचा प्रत्येक सामना महत्त्वाचा असल्याचे सांगत आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरणार असल्याचे म्हटले आहे.

दुबई : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वीच पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने भारतीय संघाला लक्ष्य करण्यास सुरवात करत आमच्यासाठी भारताविरुद्धचा प्रत्येक सामना महत्त्वाचा असल्याचे सांगत आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरणार असल्याचे म्हटले आहे.

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेला 16 सप्टेंबरपासून सुरवात होत आहे. पाकिस्तानचा पहिला सामना पात्रता फेरीतून आलेल्या हाँगकाँगशी होणार आहे. त्यानंतर 19 सप्टेंबरला पाकिस्तानची लढत भारताशी होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष आहे. या सामन्यापूर्वीच सर्फराजने भारताविरुद्धचा सामना महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ आशिया करंडकात खेळणार आहे. 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता.

सर्फराज म्हणाला, की पहिल्या सामन्यापासून आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पुढील सामन्यात हीच कामगिरी टिकून राहिल. युएईमध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्ध केलेली कामगिरी आम्हाला फायद्याची ठरणार आहे. भारताविरुद्ध आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरणार आहोत. चॅम्पियन्स करंडकात आम्ही भारताचा केलेल्या पराभवाचा विचार करत नाही. आमच्यासाठी त्यांच्याविरुद्धचा प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. भारताविरुद्ध आम्ही अंतिम सामन्यातही खेळू शकतो. कोणत्याही संघाला आम्ही कमी लेखणार नाही.

संबंधित बातम्या