CPL2020: आंद्रे रसेलच्या अर्धशतकी खेळीनंतर देखील जमेका थलायवाजची हार   

टीम ई-सकाळ
Sunday, 23 August 2020

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये गयाना अमेझॉन वॉरियर्स आणि जमेका थलायवाज यांच्यात झालेल्या सामन्यात  गुयाना अमेझॉन वॉरियर्स संघाने विजय मिळवला आहे.

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये गयाना अमेझॉन वॉरियर्स आणि जमेका थलायवाज यांच्यात झालेल्या सामन्यात  गुयाना अमेझॉन वॉरियर्स संघाने विजय मिळवला आहे. या विजयामुळे गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्सला तीन सामन्यांमध्ये चार गुण मिळाले असून, गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्स कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. 

लुकाकूच्या आत्मघाती गोलमुळे युरोपा लीगमध्ये सेविलाची खिताबावर मोहर   

गयाना अमेझॉन वॉरियर्सने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 118 धावा केल्या होत्या. गयाना अमेझॉन वॉरियर्सचे सलामीवीर चंद्रपॉल हेमराज 21 आणि ब्रँडन किंग 29 यांनी पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचली. मात्र त्यानंतर गयाना अमेझॉन वॉरियर्स संघाचे फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले. त्यामुळे गयाना अमेझॉनने जमेका थलायवाजला 119 धावांचे लक्ष्य दिले. परंतू या लक्ष्याचा पाठलाग करताना, जमेका थलायवाजचा संघ 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 104 धावाच करू शकला. 

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड 

जमेका थलायवाज कडून आंद्रे रसेलने आपले वैशिष्ट्यपूर्ण स्फोटक डाव खेळला. त्याने चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 37 चेंडूंत 52 धावा काढल्या. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. गयाना अमेझॉन वॉरियर्सच्या मुजीब-उर-रहमानने 4 षटकात 18 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. तर जमेका थलायवाज संघातील कार्लोस ब्रेथवेटने 3.1 षटकात 14 धावा देत 3 बळी मिळवले.   

    


​ ​

संबंधित बातम्या