EngVsPak : बाबर आझमच्या फलंदाजीत लहान तांत्रिक दोष - रमीझ राजा  

टीम ई-सकाळ
Thursday, 6 August 2020

सुरवातीला बाबर आझम मैदानावर आल्यानंतर अडखळत असताना  त्याच्या फलंदाजीत काही त्रुटी असल्याचे रमीझ राजा यांनी म्हटले आहे. 

कोरोनाच्या संकटातून सावरत मागील महिन्याच्या 8 जुलै पासून इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. त्यानंतर आता पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना काल बुधवारी 5 ऑगस्टपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे चालू झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने अबिद अलीला 16 धावांवर बाद करत पाकिस्तानला पहिलाच धक्का दिला. तर त्यानंतर आलेल्या पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला शून्य धावांवर क्रिस वोक्सने पायचीत केले. मात्र बाबर आझम आणि सलामीवीर शान मसूदने पहिल्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत संघाची पडझड रोखली.     

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...    

पहिल्या दिवशीच्या खेळात 19 व्या षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावांवर पाकिस्तानचा संघ धडपडत असताना, बाबर आझम क्रीजवर आला. सुरवातीला क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर बाबर आझमने अडखळत सुरवात केली. मात्र त्यानंतर मैदानावर पाय रोवत 100 चेंडूत 14 वे कसोटी अर्धशतक झळकावले. परंतु पाकिस्तानचे माजी खेळाडू आणि समालोचक रमीझ राजा यांनी बाबर आझमवर टीका केली. सुरवातीला बाबर आझम मैदानावर आल्यानंतर अडखळत असताना  त्याच्या फलंदाजीत काही त्रुटी असल्याचे रमीझ राजा यांनी म्हटले आहे. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

रमीझ राजा यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर बाबर आझमच्या खेळीसंदर्भात  बोलताना, फलंदाजीच्या वेळेस बाबर आझमच्या डोक्याची दिशा योग्य नसल्याचे सांगितले. व त्यामुळे आऊटस्विंग चेंडूचा सामना करणाऱ्या फलंदाजांना अडचणी येत असल्याचे रमीझ राजा यांनी म्हटले आहे. शिवाय पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूने बाबर आझम या युवा फलंदाजीच्या भूमिकेचे वर्णन 'लहान तांत्रिक दोष' म्हणून केले. आणि ज्यासाठी काही फिक्सिंग आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

दरम्यान, पाकिस्तानने दुसर्‍या दिवशी म्हणजे आज 139 वर 2 धावसंख्येच्या पुढे फलंदाजीला पुन्हा सुरुवात केली. पण, पहिल्या दिवशी अर्धशतक केलेल्या बाबर आझमला 69 जेम्स अँडरसनने जो रूट कडे झेलबाद करत इंग्लंडला यश मिळवून दिले. तर यानंतर आलेल्या असद शफिकला 7 धावांवर स्टुअर्ट ब्रॉडने आणि मोहम्मद रिझवानला 9 धावांवर वोक्सने बाद केले. त्यामुळे सध्या उपहारापर्यंत पाकिस्तानची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 187 झाली आहे. सलामीवीर शान मसूद 77 धावांवर व शादाब खान 1 धावांवर खेळत आहे.                      


​ ​

संबंधित बातम्या