इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूक होणार निवृत्त

वृत्तसंस्था
Monday, 3 September 2018

भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ 3-1 असा विजयी आघाडीवर असताना कूकने निवृत्तीचा निर्णय आज (सोमवार) जाहीर केला. या निवृत्तीनंतर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 12 वर्षांची कारकिर्दी संपुष्टात येणार आहे. कूक हा इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 

लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार सलामीवीर फलंदाज ऍलिस्टर कूक याने भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ 3-1 असा विजयी आघाडीवर असताना कूकने निवृत्तीचा निर्णय आज (सोमवार) जाहीर केला. या निवृत्तीनंतर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 12 वर्षांची कारकिर्दी संपुष्टात येणार आहे. कूक हा इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. 

कूकने कसोटी कारकिर्दीत खेळलेल्या 160 सामन्यांमध्ये 44.88 च्या सरासरीने 12254 धावा केल्या आहेत. यामध्ये 32 शतकांचा समावेश आहे. कूकच्या सुरवातीच्या फॉर्मवर तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मोडेल असे मानले जात होते. कूकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने खेळलेल्या 59 कसोटी सामन्यांमध्ये 24 सामन्यांत विजय, 22 सामन्यांत पराभव आणि 13 सामने अनिर्णित राहिले होते. 

भारताविरुद्धच्या मालिकेत कूकला पूर्णपणे अपयश आले होते. त्याची कामगिरी समाधानकारक होत नसल्याने त्याच्यावर जोरदार टीका करण्यात येत होती. अखेर त्याने आपल्या कारकिर्दीची अखेर करण्याचा निर्णय घेतला आहे.

​ ​

संबंधित बातम्या