इंग्लंडचा गडी नियम विसरला; पंचांनी मग खेळ थांबवला!

सुशांत जाधव
Sunday, 19 July 2020

सँनिटायझर आणि टिश्यू पेपरच्या साहय्याने चेंडू निर्जंतुकीकरण केल्यानंतर  पंचांनी खेळ पुन्हा सुरु केला.

मँचेस्टर : कोरोनाजन्य संकटातून सावरत इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघातील खेळांडूना कोविड-19 ची खबरदारी म्हणून काही नियम आखून दिले आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगपासून स्वच्छतेबद्दलच्या नियमांचे  पालन करत पहिला कसोटी सामना सुरळीत पार पडला. मात्र मँचेस्टरच्या मैदानात अनावधानाने शतकवीर डॉम सिब्लेनं चेंडूला लाळ लावल्याची घटना घडली. विंडीजच्या डावातील 41 व्या षटकात क्रिस वोक्स गोलंदाजी करत असताना हा सर्व प्रकार घडला. मैदानातील हा प्रकार पंच मायकल यांनी कटाक्ष नजरेनं टिपत खेळ थांबवला.

भारतीय क्रिकेटरच्या 'किस' ची ही स्टोरी तुम्ही 'मिस'तर नाही ना केली  

सँनिटायझर आणि टिश्यू पेपरच्या साहय्याने चेंडू निर्जंतुकीकरण केल्यानंतर  पंचांनी खेळ पुन्हा सुरु केला. आयसीसीच्या नव्या नियमावलीनुसार, चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थूंकीचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. या कृतीमुळे कोरोनाचा प्रादुरभावाला निमंत्रण दिल्यासारखे ठरेल, त्यामुळे हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. मैदानात जर कोणी खेळाडू चेंडूला लाळ किंवा थूंकी लावताना आढळले तर पहिल्यांदा त्याला सूचना देण्यात येईल. जर दुसऱ्यांदा पुन्हा असा प्रकार घडला तर संघाला 5 धावांची पेनल्टी भोगावी लागेल. सिब्लेपूर्वी इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरने कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले होते. पहिल्या कसोटी सामन्यानंतर संघाची साथ सोडून मैत्रीणीला भेटायला जाणे त्याला चांगलेच नडले होते. मँचेस्टरवर रंगलेल्या कसोटीला तो मुकला असून त्याच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. 

कोरोनामुक्त झाल्यानंतर टेनिसपटू पुन्हा उतरला कोर्टवर

मँचेस्टरच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाज चांगलाच संघर्ष करताना दिसत आहेत. विंडीज गोलंदाजांप्रमाणे घरच्या मैदानात खेळत असलेल्या इंग्लिश गोलंदाजांनाही चेंडू स्विंग करण्यात अडचणी येत आहे. लाळचा वापर न करता चेंडूची चकाकी कायम ठेवणे शक्य नाही. परिणामी चेंडू स्विंग करण्यासाठी गोलंदाजांना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे.  विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर यजमानांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार कमबॅक केले. इंग्लंडने आपला पहिला डाव 9 बाद 469 धावांवर घोषीत केला. त्यानंतर विंडीज संघाला लवकरात लवकर आटोपून मालिकेत बरोबरी साधण्याची त्यांच्याकडे संधी होती. पण सध्या विंडीजच्या संघ सुस्थितीत आहे. तिसऱ्या दिवशी पावासाचा मारा आणि आता विंडीज फलंदाजांचा संयमी खेळ यामुळे दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहण्याचे संकेत मिळत आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या