ENGvsWI : जोफ्रा आर्चरवर कोविड-19 प्रोटोकॉलच्या उल्लंघनावरून कारवाई 

टीम ई-सकाळ
Sunday, 19 July 2020

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कोरोनाजन्य परिस्थितीत खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेत, जैविक सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जोफ्रा आर्चरला दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवला होता.

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कोरोनाजन्य परिस्थितीत खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेत, जैविक सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जोफ्रा आर्चरला दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर आता इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी)  जोफ्रा आर्चरला त्याच्या कृतीबद्दल दंड ठोठावला असून, जैव-सुरक्षित प्रोटोकॉलचा भंग केल्याबद्दल अधिकृत लेखी इशारा देखील पाठविला आहे. काल शुक्रवारी ईसीबी मंडळाचे अधिकारी एश्ले जिल्स यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिस्तभंगाच्या सुनावणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

भारतीय क्रिकेटरच्या 'किस' ची ही स्टोरी तुम्ही 'मिस'तर नाही ना केली  

ओव्हल ट्रॅफर्ड येथील वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या अगोदर जोफ्रा आर्चरने जैव-सुरक्षित प्रोटोकॉलचा भंग करत होव येथील त्याच्या घरी भेट दिली होती. त्यामुळे आर्चरला दुसर्‍या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघातून वगळण्यात आले होते. जैव-सुरक्षित प्रोटोकॉल तोडल्याबद्दल आर्चरच्या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याशिवाय आता जोफ्रा आर्चरला पाच दिवस आयसोलेशनध्ये रहावे लागणार आहे. व दोन कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या तरच त्याला पुन्हा संघात स्थान मिळवण्यासाठी दरवाजे उघडे होतील, असे इंग्लंडच्या बोर्डाने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, जैवसुरक्षित वातावरणात इंग्लंड - वेस्ट इंडिज मालिका होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या कसोटीनंतर इंग्लंड संघ एकत्रितपणे एजेस बाऊलहून ओल्ड ट्रॅफर्डला येणे अपेक्षित होते. मात्र या प्रवासादरम्यान आर्चर होव येथे गेला असल्याचे समजले. दुसऱ्या कसोटीसाठी निवडलेल्या संघात आर्चरचा समावेश असल्याचे जाहीर झाल्यावरच हे इंग्लंड संघ व्यवस्थापनाच्या लक्षात आले होते. त्यानंतर आर्चरनेही आपल्याकडून चूक झाल्याची कबुली दिली होती. माझे कृत्य फक्त एकट्यासाठीच नव्हे तर संपूर्ण संघासह प्रतिस्पर्धी संघाला धोक्यात टाकणारे होते. मी याबद्दल सर्वांची माफी मागतो, असे जोफ्रा आर्चरने म्हटले आहे. 

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये वेस्टहॅमच्या आक्रमक खेळीने वॅटफोर्डचा पराभव  

कोरोनाच्या महामारीनंतर इंग्लंड-वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. तब्बल 117 दिवसांच्या ब्रेकनंतर साउथहॅम्पटनच्या मैदानात जैविक सुरक्षिततेच्या खबरदारीसह ही मालिका सामना खेळवण्यात येत आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या