बेन स्टोक्सचा विक्रमी मास्टर स्ट्रोक; सोबर्स अन् कपिल पाजींच्या पक्तींत मिळवले स्थान

सुशांत जाधव
Saturday, 11 July 2020

कोरोनाजन्य संकटामुळे जवळपास तीन महिन्याहून अधिक काळ सरावाशिवाय असतानाही मैदानात उतरुन संघाला संकटातून बाहेर काढण्याची क्षमता असल्याचे बेन स्टोक्सने तिसऱ्या दिवशी दाखवू दिले.

लंडन : कोरोना विषाणूच्या संकटजन्यपरिस्थितीतून क्रिकेटला सावरण्यासाठी इंग्लंड आणि वेस्ट इंडीजचे संघ मैदानात उतरले आहेत. प्रेक्षकांशिवाय एजेस बाऊल स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात इंग्लंडच्या कर्णधाराने अनोखा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे.  कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावांसह 150 बळी मिळवणारा बेन स्टोक्स इंग्लंडचा दुसरा अष्टपैलू ठरलाय.  स्‍टोक्‍सने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अल्झारी जोसेफला तंबूचा रस्ता दाखवत आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली. या कामगिरीसह त्याने इंग्‍लंडचे दिग्‍गज अष्टपैलू इयान बॉथम यांच्या पक्तींत स्थान मिळवले.

किंग खाननं गंभीरला दिलेली मुभा दादाला दिली नव्हती

क्रिकेटच्या मैदानात अशी कामगिरी करणारा स्‍टोक्‍स  सहावा क्रिकेटर आहे. यापूर्वी कॅरेबियन दिग्‍गज गॅरी सोबर्स, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, भारताचे कपिल देव, न्यूझीलंडचा माजी कर्णधार डेनियल व्हिक्टोरी यांनी असा पराक्रमक करुन दाखवला आहे.  सोबर्स यांनी 63 कसोटीत हा पल्ला गाठला होता. स्टोक्सने 63 व्या कसोटी सामन्यात हे लक्ष्य प्राप्त केले. कोरोनाजन्य संकटामुळे जवळपास तीन महिन्याहून अधिक काळ सरावाशिवाय असतानाही मैदानात उतरुन संघाला संकटातून बाहेर काढण्याची क्षमता असल्याचे बेन स्टोक्सने तिसऱ्या दिवशी दाखवू दिले.

क्रीडा विषयक सविस्तर बातम्यांसाठी फॉलो करा   आणि लाइकसह शेअर करायलाही विसरु नका  

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीच्या जोरावर यजमान इंग्लंडचा संघ पुन्हा सामन्यात आला. रोस्टन चेस (Roston Chase) आणि शेन डोरिच (Shawn Dawrich) यांच्यात 81 धावांची भागीदारी फोडत स्टोक्सने इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. बेन स्टोक्स (Ben Stokes) च्या माऱ्यासमोर अखेरच्या पाच षटकात विंडीजने  51 धावांत 5 गडी गमावले. विंडीजने पहिल्या डावात 114 धावांची आघाडी घेतली.  स्टोक्सने 49 धावा खर्च करुन 4 विकेट घेतल्या. 


​ ​

संबंधित बातम्या