ENGvsWI 3rd Test : पावसाच्या खेळीमुळे तिसऱ्या व निर्णायक कसोटीत इंग्लंडला संघर्ष करावा लागणार  

टीम ई-सकाळ
Monday, 27 July 2020

आज चौथ्या दिवशी सामन्याचा एकही चेंडू खेळला जाऊ शकला नाही. त्यामुळे उद्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी मालिकेत विजय मिळवण्यासाठी इंग्लंडला संघर्ष करावा लागणार आहे.  

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जात आहे. मात्र पावसाच्या आगमनामुळे या सामन्याचा चौथा दिवस रद्द करण्यात आला आहे.  पावसाच्या व्यत्ययामुळे आज चौथ्या दिवशी सामन्याचा एकही चेंडू खेळला जाऊ शकला नाही. त्यामुळे उद्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी मालिकेत विजय मिळवण्यासाठी इंग्लंडला संघर्ष करावा लागणार आहे.  

पुढील वर्षाच्या ऑस्ट्रेलियन ओपनसाठी आयोजकांनी घेतले मोठे निर्णय 

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 369 धावा केल्या. यानंतर इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या धारदार गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 197 धावांवर सर्वबाद झाला. तर, दुसऱ्या डावात इंग्लंडच्या संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यात २२६ धावांवर आपला डाव घोषित करत, 389 धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजला दिले आहे. मात्र तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दिलेल्या 389 धावांचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिज संघाने 2 फलंदाज गमावत 10 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. मात्र आता चौथ्या दिवस पावसामुळे वाया गेल्याने इंग्लंडला उद्या कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजच्या 8 फलंदाजांना बाद करावे लागणार आहे.     .

ENGvsWI 3rd Test :स्टुअर्ट ब्रॉडच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंड मजबूत स्थितीत   

दरम्यान, कोरोनाच्या संकटातून सावरत इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर, साउथहॅम्प्टनच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला नमवत पाहुण्या विंडीज संघाने तर मँचेस्टर येथील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. त्यामुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज संघाशी 1 - 1 ने बरोबरी साधली आहे. तसेच पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे खेळ सुरु करण्यास विलंब झाला होता. याव्यतिरिक्त दुसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळेस देखील तिसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

 


​ ​

संबंधित बातम्या