होल्डरची कमाल, साहेबांचा अर्धा संघ तंबूत धाडत षटकाराने रचला अनोखा विक्रम
गोलंदाजीप्रमाणेच फलंदाजीमध्येही तो विंडीजसाठी ट्रम कार्ड ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
साऊथॅम्प्टन : कोरोनातून सावरत एजेस बाऊलच्या मैदानात उतरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पाहुण्या विंडीज संघाने इंग्लंडला सावरण्याचा मोका दिला नाही. पहिल्या दिवशी पावसाचा डाव रंगल्याचे पाहायला मिळाले. शेनॉन गॅब्रियलने दुसऱ्याच षटकात इंग्लंडच्या सलामीवीर सिब्लेची उजवी यष्टी उडवत विंडीजला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने आपली हुकमत गाजवली. त्याने एकट्याने इंग्लंडचा अर्धा संघ माघारी धाडला. मध्य फळीतील झॅक क्राउलेला अवघ्या 10 धावांवर तंबूत धाडत जेसन होल्डने आपल्या विकेटचे खाते उघडले. अवघ्या काही अंतरानेच त्याने ओली पोपला 12 धावांवर माघारी धाडले.
Jason’s 6 wickets now best figures by a West Indian captain against England.
Prev: 5-31 John Goddard at Georgetown in 1948
Prev (in Eng): 5-41 by Garry Sobers at Leeds in 1966#WIReady #ENGvWI pic.twitter.com/BoNWAG9rIg— Windies Cricket (@windiescricket) July 9, 2020
पाहुणे जोमात; यजमान 'साहेब' कोमात! क्रिकेटसह इतर स्पोर्ट्समधील घडामोडी एका क्लिकवर
आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने जोस बटलरच्या साथीने एक आश्वासक भागीदारी रचून इंग्लिश ताफ्याच्या जीवात जीव आणला. तो अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना जेसन होल्डरने त्याच्या रुपात विंडीजला मोठे यश मिळवून दिले. बेन स्टोक्सने इंग्लंडकड़ून सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ होल्डरने बटलरलाही माघारी धाडले. जोफ्रा आर्चरला शून्यावर माघारी धाडत होल्डरने पाच विकेटचा टप्पा गाठला. मार्क वूडच्या रुपात त्याला सहावी विकेट मिळाली. जेसन होल्डरने 20 षटकातील 6 षटके निर्धाव टाकत 42 धावा खर्च करुन 6 बळी टिपले. आतापर्यंत त्याने सातव्यांदा पाचपेक्षा अधिक बळी मिळवण्याचा पराक्रम केलाय. वेस्ट इंडिजच्या कर्णधाराने इंग्लंडविरुद्ध नोंदवलेली ही सर्वोच्च कामगिरी आहे. यापूर्वी जॉन गॉडर्ज यांनी 1948 मध्ये जॉर्ज टाउनच्या मैदानात विंडजचे नेतृत्व करताना 31 धावा खर्च करुन 5 बळी टिपले होते. याशिवाय 1966 मध्ये गॅरी सोबर्स यांनी लीड्सच्या मैदानात 41 धावा खर्च करुन पाच बळी टिपण्याचा पराक्रम केला होत्या. या दोन दिग्गजांचा विक्रम ओलांडत विंडीज कर्णधाराने ऐतिहासिक सामन्यात नवा विक्रम प्रस्थापित केला.
कोरोनानंतर 'या' गोलंदाजाने घेतली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट
होल्डरने 41 कसोटी सामन्यातील 70 डावात आतापर्यंत 112 बळी मिळवले आहेत. यासाठी त्याने 2838 धावा खर्च केल्यात. गोलंदाजीप्रमाणेच फलंदाजीमध्येही तो विंडीजसाठी ट्रम कार्ड ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर तब्बल 117 दिवसांनी सुरु झालेल्या सामन्यात त्याच्याशिवाय ग्रॅब्रियलने 4 विकेट घेत त्याला उत्तम साथ दिली. जलदगती दोन्ही जलदगती गोलंदाजांच्या माऱ्यासमोर यजमानांचा संघ हतबला ठरला. इंग्लंडच्या गोलंदाजीत अशीच धार दिसणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.
Huge wicket for the tourists.
Scorecard/Videos: https://t.co/ldtEXLDT8V#ENGvWI pic.twitter.com/wN7JS1Qe1l
— England Cricket (@englandcricket) July 9, 2020