क्रिकेट पुनरागमनात आता कोणाचा व्यत्यय वाचा..

शैलेश नागवेकर
Wednesday, 8 July 2020

सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉम सिब्ले है मैदानावर आले आणि विंडीजचा केमार रोच पहिल्या चेंडूसाठी रनअपवरून धावला तो क्षण सर्वांना नवी उमेद देणारा ठरला.

लंडन :  अखेर 117 दिवसांच्या प्रदीर्घ कालवधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाले पण पण पावसाचे विघ्न आले. इंग्लंड-वेस्ट इंडीज यांच्यातील ऐतिहासिक कसोटी समन्यात उपाहारानंतर तीन षटकांचा खेळ झाला यात इंग्लंडची 1 बाद 1 अशी अवस्था झाली. कोरोनाचा विळखा आणि लॉकडाऊनचे निर्बध यामुळे बंद झालेले क्रिकेट सुरू झाले. तमाम क्रिकेट विश्वाचे लक्ष या कसोटी सामन्याकडे लागलेले असताना प्रत्यक्ष खेळापेक्षा प्रतिक्षाच सर्वांच्या पदरी आली. 

विराट-श्रेयशचा शेजारधर्म.... 'होम मेड' डोसा फॉर कॅप्टन!

एजेस बाऊल स्टेडियमवर मुळात सकाळपासून हलका पाऊस होता, त्यामुळे पहिल्या सत्राचा खेळ झाला नाही. इग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉम सिब्ले है मैदानावर आले आणि विंडीजचा केमार रोच पहिल्या चेंडूसाठी रनअपवरून धावला तो क्षण सर्वांना नवी उमेद देणारा ठरला. पहिली धाव फलकावर लागण्याअगोदर गॅब्रियलने सिब्लेची उजवी यष्टी उडवली आणि पहिली अ‍ॅक्शन घडली, पण काही वेळातच पुन्हा पाऊस आला आणि खेळ थांबवावा लागला. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आणि आयसीसीच्या नव्या नियमाचे पालन करून हे क्रिकेट सुरू झाले. त्याअगोदर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी गुडघ्यावर रहात ब्लॅक लाईव मॅटर या मोहिमेला पाठींबा दर्शवला.

क्रिडा जगतातील  अन्य बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिला दिवसावर पावसाचे वर्चस्व राहिले. पहिल्या दिवशी केवळ 17.4 षटकांचा  खेळ झाला. यात इंग्लंडने 1 बाद 35 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तेव्हा आर बर्न्स 55 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 20 धावांवर खेळत होता. तर दुसऱ्या बाजूला जो डेन्ली 48 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 14 धावा केल्या होत्या. या जोडीने 99 चेंड़ूत 35 धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळावर पावसाने पाणी फेरल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ वेळेत सुरु होणार का? आणि इंग्लंडची बर्न्स-डेन्ली जोडी एक चांगली भागीदारी करत यजमानांना सावरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

 


​ ​

संबंधित बातम्या