ENGvsIRE :अनलॉक ODI मधील कमालीचा योगायोग!

सुशांत जाधव
Friday, 31 July 2020

दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेल्या गड्याची आयर्लंड संघाकडून पदार्पणात धमाकेदार कामगिरी

कोरोनामुळे बेरंग झालेल्या क्रिकेटच्या मैदानात अखेर रंगीत कपड्यात खेळाडू मैदानात उतरले. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेने एकदिवसीय सामन्यालाही आता सुरुवात झाली आहे. दोन्ही देशातील तीन सामन्यांच्या मालिकेला साऊथॅम्प्टनच्या द रोझ बाउल स्टेडियमवर रंगलेल्या सामन्याने सुरुवात झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लिश गोलंदाजांसमोर आघाडीच्या आयरिश फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्टिस कॅम्फरने कमालीची खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 118 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने नाबाद 59 धावा केल्या. दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली असती तर  संघाच्या धावसंख्या त्याने द्विशतकी पार केली असती. पण तसे झाले नाही. 

ICC Test WC : पाकची धुलाई केली तरी भारताची बरोबरी करणं इंग्लंडला जमणार नाही

फलंदाजी हात साफ केल्यानंतर कर्णधाराने ज्यावेळी गोलंदाजीसाठी चेंडू हातात दिला त्यावेळी या पठ्याने टॉम बँटनची विकेट घेत अनोखा पराक्रम आपल्या नावे केला. 2018 मध्ये कर्टिसने दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. या सामन्यातही त्याने टॉम बँटनचीच विकेट घेतली होती. दोनवर्षानंतर आयर्लंडकडून इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण करताना त्याने टॉमला माघारी धाडत एकदिवसीयमधील पहिली विकेट आपल्या नावे केली. कर्टिस कॅम्फर हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर आहे. त्याची आजी (आईची आई) आयरिश असल्यामुळे त्याला आयर्लंडचा पासपोर्ट मिळाला. त्यानंतर त्याने आयर्लंडसंघात स्थान मिळवले आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

आयर्लंडचा पासपोर्ट मिळवला.  त्यानंतर त्याने आयर्लंडसंघात स्थान मिळवले आहे. त्याच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे आयर्लंड संघाला  44.4 षटकात 172 धावांपर्यंत मजल मारता आली.  गॅरेथ डेलानी (22) केविन ओ ब्रायन (22) अँडी मॅकब्राईन (40) क्रेग यंग (11) या फलंदाजांव्यतिरिक्त अन्य एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.  ऑयर्लंडने दिलेल्या धावांचा पाठलाग इंग्लंडचा संघ सहज करेल असे वाटत होते. पण संघाने जेसन रॉय (24), जॉनी बेअरस्टो (2), जेम्स विंची (25), टॉम बँटन (11) यांच्या विकेट्स अगदी स्वस्तात फेकल्या. सॅम बिलंगने  54 चेंडूत केलेल्या नाबाद  67 धावा (11 चौकार) आणि  इयॉन मॉर्गनने 40 चेंडूत नाबाद 36 धावांची खेळी करत इंग्लंडने पहिला सामना 22.1  षटके आणि 6 गडी राखून खिशात घातला.  


​ ​

संबंधित बातम्या