भारतासाठी योगायोगांचीच 'मालिका'

वृत्तसंस्था
Wednesday, 22 August 2018

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामने खेळले होते. इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका यांच्यातील अनेक योगायोग जुळून येत आहेत.

नॉटिंगहम : भारतासाठी परदेशी दौरे नेहमीच महत्त्वाचे असतात. परदेशा दौऱ्यात अपयश आल्यावर भारतीय संघाला नेहमी 'गली का शेर' संबोधले जाते. वर्षाच्या सुरुवातीला भारताने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामने खेळले होते. इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका यांच्यातील अनेक योगायोग जुळून येत आहेत.

दक्षिण आफ्रिकेत खेळले गेलेला पहिला कसोटी सामना भारताने 72 धावांनी गमवला होता. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणेच या सामन्यातही भारताचा थोडक्यात पराभव झाला होता. लॉर्डसवरील कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला होता. अगदी असाच दारुण पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही झाला होता. या सामन्यात भारताचा 135 धावांनी पराभव झाला होता. नॉटिंगहम येथे झालेल्या सामन्यात भारताने जबरदस्त पुनरागमन करत 203 धावांनी विजय मिळवला. योगायोग म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यातही भारताने पुनरागमन करत 63 धावांनी विजय मिळवला होता. 

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा हा या दोन्ही दौऱ्यातील आणखी एक साम्य आहे. त्याने इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाच बळी घेतले आहेत. तसेच भारतीय वेगवान गोलंदजांनीही दोन्ही दौऱ्यातील योगयोग जुळवून आणले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्व 20 फलंदाजांनी बाद केले होते. इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी अश्विनने घेतलेला अॅंडरसनचा बळी सोडता सर्व 19 फलंदाज हे वेगवान गोलंदाजांनी बाद केले आहेत.   
 

संबंधित बातम्या