पुजारासाठी सेहवागची बॅटिंग

वृत्तसंस्था
Monday, 6 August 2018

चेतेश्वर पुजाराचा संघात सहभाग न करुन घेण्याच्या कोहलीच्या  निर्णयावर सर्वाधिक टिका होत आहे. भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागनेही आता कोहली आणि शास्त्रींवर भारतीय संघ निवडीवरुन निशाणा साधला आहे.   

मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 31 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय संघाच्या निवडीमुळे कोहली आणि मार्गदर्शक रवी शास्त्रींवर टिकेची झोड उठत आहे. चेतेश्वर पुजाराचा संघात सहभाग न करुन घेण्याच्या कोहलीच्या  निर्णयावर सर्वाधिक टिका होत आहे. भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागनेही आता कोहली आणि शास्त्रींवर भारतीय संघ निवडीवरुन निशाणा साधला आहे.   

पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवाला संपूर्णपणे फलंदाजांचे अपयश कारणीभूत होते. 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 162 धावांवर माघारी परतला. 

 

कौंटी क्रिकेटमध्ये पुजाराला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याने 12 डावांत 14.33च्या सरासरीने फक्त 172 धावा केल्या होत्या. इंगल्ंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. संघ निवडीबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम असताना सेहवागनेही अत्यंत वेगळ्या स्टाईलमध्ये पुजाराला संघात स्थान मिळणार का असा प्रश्न विचारला आहे.  

इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अष्टपैलू बेन स्टोक्सला वगळण्यात आले असून त्याच्या ऐवजी ख्रिस वोक्सला संघात स्थान देण्यात आल आहे. तसेच डेव्हिड मलानला वगळ्यात आले असून त्याच्या जागी ऑली पोप या नवोदित खेळाडूला संधी देण्यात आली आहे. याच घरतीवर सेहवागने शक्कल लढवत लॉर्डसच्या मैदानावर पोप आला आता पुजारा येणार काय़ असा प्रश्न विचारला आहे. 

संबंधित बातम्या