#INDvsENG दुसऱ्या कसोटीतील बुमराच्या सहभागाबद्दल साशंकता

वृत्तसंस्था
Monday, 6 August 2018

बुमरा रोज संघातील इतर खेळाडूंसोबत सराव करतो आहे. मात्र त्याला मैदानात उतरुन गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त व्हावे लागणार आहे आणि त्यासाठी थोडा अजून वेळ लागणार आहे. 

बर्मिंगहम : अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आलेला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराचे पुनरागमन लांबणीवर पडले आहे. 

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यादरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. दुखापत होऊनही भारतीय निवड समितीने त्याला कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी संघात स्थान देण्यात आले होते. 

बुमरा दुसरा आणि तिसरा कसोटी सामना खेळण्याची शक्यता होती, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुमराला झालेली दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता कमी झाली आहे. बुमरा रोज संघातील इतर खेळाडूंसोबत सराव करतो आहे. मात्र त्याला मैदानात उतरुन गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त व्हावे लागणार आहे आणि त्यासाठी थोडा अजून वेळ लागणार आहे. 

लॉर्डसच्या मैदानावर खेळपट्टीच्या बाजूने चारही दिशांना उतार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्यासाठी बुमरा अत्यंत उपयोगी ठरला असता.

संबंधित बातम्या