विराटचे 'माईक ड्रॉप सेलिब्रेशन' जेनिंग्जला वाटले 'कूल'

वृत्तसंस्था
Thursday, 2 August 2018

ज्यो रुटला धावबाद केल्यावर विराट कोहलीने साजरा केलेला आनंद इंग्लंडचा सलामीवीर किटॉन जेनिंग्जला 'कूल' वाटला.

एजबस्टन : ज्यो रुटला धावबाद केल्यावर विराट कोहलीने साजरा केलेला आनंद इंग्लंडचा सलामीवीर किटॉन जेनिंग्जला 'कूल' वाटला.  

इंग्लंडने 3 बाद 216 अशी भक्कम धावसंख्या उभारला होती. 63व्या षटकात रुट 80 धावांवर खेळत असताना विराट कोहलीने अवघड पोझिशनमधून वळत थेट थ्रो केला आणि दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात रूट धावचीत झाला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रुटने शतक पूर्ण केल्यावर 'माईक ड्रॉप सेलिब्रेशन' केले होते. त्याचीच नक्कल करत कोहलीने रुटला धावचीत केल्यावर 'माईक ड्रॉप सेलिब्रेशन' केले. 

कोहलीच्या आनंद साजरा करण्याच्या या पद्धतीवर इंग्लंडचा सलामीवीर जेनिंग्ज म्हणाला,'' प्रत्येक खेळाडूला त्याला हवं तसा आनंद साजरा करण्याची मुभा आहे. त्याने आनंद साजरा केली आणि त्यात काही गैर नाही.''

रुट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजीला ग्रहण लागले आणि 4 बाद 216 वरुन त्यांची अवस्था 9 बाद 285 झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी अश्विनने 60 धावा देत 4 बळी घेतले.   

संबंधित बातम्या