शास्त्री म्हणतात, आता जग बघेल विराटचा जलवा

वृत्तसंस्था
Monday, 30 July 2018

''आम्ही येथे सामना बरोबरीत सोडण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी आलो आहोत. आम्ही प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच खेळतो.''

नवी दिल्ली : भारत सध्या प्रतिष्ठेच्या इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी मालिकेसह त्यांच्या खऱ्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. भारतीय फलंदाजीची मदार कर्णधार विराट कोहलीवर असून पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारताचे मार्गदर्शक रवी शास्त्री यांनी विराटचे भरभरुन कौतुक केले आहे.

शास्त्री म्हणाले, ''मागील चार वर्षात विराटने उत्तम प्रदर्शन केले आहे, हे मी सांगण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही अशा रितीने फलंदाजी करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास बळावतो आणि तुम्ही मानसिकरित्या सक्षम बनता. तुमच्या खेळाचा दर्जाही वाढतो. मग तुम्ही कोणत्याही आव्हानाला सामोरे जायला तयार असता. विराट कोहलीला 2014च्या इंग्लंड दौऱ्यात धावा करण्यात अपयश आले होते हे मान्य आहे. परंतू त्याची सध्या गणना सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. त्याची गणना सर्वोत्तम खेळाडूंमध्ये का केली जाते हे त्याला ब्रिटिश जनतेला दाखवून द्यायचे आहे.''

''आम्ही येथे सामना बरोबरीत सोडण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी आलो आहोत. आम्ही प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच खेळतो.'' असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच चेतेश्वर पुजाराच्या फॉर्मबद्दल बोलताना ते म्हणाले, ''इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पुजाराला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. मला त्याच्या फॉर्मबद्द्ल अजिबात चिंता नाही.''

संबंधित बातम्या