गांगुलीच्या मते असा असावा पहिल्या कसोटीसाठी संघ

वृत्तसंस्था
Monday, 30 July 2018

भारत आणि इंग्लंड यांच्यात एक ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेवर सगळ्याचे लक्ष आहे. हि मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने भारतीय संघ सर्वोत्तम खेळाडूंसह मैदानात उतरेल. भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीच्या मते भारताने मुरली विजय आणि लोकेश राहुल यांना सलामीसाठी पाठवावे.  

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात एक ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेवर सगळ्याचे लक्ष आहे. हि मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने भारतीय संघ सर्वोत्तम खेळाडूंसह मैदानात उतरेल. भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीच्या मते भारताने मुरली विजय आणि लोकेश राहुल यांना सलामीसाठी पाठवावे.  

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने शिखर धवन हा उत्तम एकदिवसीय फलंदाज आहे. मात्र विराट कोहलीसाठी विजय-राहुल हा जोडी उपयोगी ठरेल असे मत व्यक्त केले. तो म्हणाला, ''शिखर धवन हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्तम फलंदाजी करतो. परंतू परदेशातील कसोटी मालिकांमध्ये धावा करण्यात त्याला सातत्याने अपयश आले आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला जास्त धावा करता आलेल्या नाहीत.'' 

शिखर धवनने मागील 18 डावांमध्ये 22.06च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर इंग्लंडमध्ये त्याची सरासरी 20.33 पर्यंत कमी झाली आहे. एसेक्सविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात तो दोन्ही डावांमध्ये पहिल्या षटकातच बाद झाला होता. याउलट विजय आणि राहुल या दोघांनीही पहिल्या डावात अर्धशतक केले होते. तसेच राहुलने दुसऱ्या डावात नाबाद 36 धावा केल्या होत्या. 

शिखर धवनने मायदेशात चांगली कामगिरी केली असल्याने त्याला संघात न घेण्याचा निर्णय अवघड असल्याचेही त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला, ''मायदेशात कसोटी सामने खेळताना शिखर धवनने अनेक शतके केली आहेत. त्यामुळे  निवड समिती काय निर्णय घेते हे पाहणे औस्तुत्याचे ठरणार आहे.''

संबंधित बातम्या