चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी झाले 9 विक्रम

वृत्तसंस्था
Saturday, 1 September 2018

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी भक्कम आघाडी घेण्याची संधी दवडली. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा तसेच तळातले फलंदाज यांनी मिळून भारताला 27 धावांची माफक आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात तब्बल 9 विक्रम नोंदवण्यात आले. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी भक्कम आघाडी घेण्याची संधी दवडली. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा तसेच तळातले फलंदाज यांनी मिळून भारताला 27 धावांची माफक आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात तब्बल 9 विक्रम नोंदवण्यात आले. 

1. कसोटी क्रिकेटमध्ये कमी डावांमध्ये 6000 धावांचा टप्पा पार करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा 120 डावांचा विक्रम मोडला. या यादीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर असून सुनिल गावसकर 117 डावासंह पहिल्या स्थानावर आहे. 

2. सॅम करन (20 वर्ष 89 दिवस) हा विराट कोहलीला बाद करणारा अवघा तिसरा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ (19 वर्ष 263 दिवस) आणि बांगलादेशचा फिरकीपटू जुबेर हुसेन (196 वर्ष 271 दिवस) हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. 

3. गेल्या 27 कसोटी सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजाराने परदेशात केलेले हे पाचवे शतक ठरले आहे. या 5 शतकांपैकी 3 शतके श्रीलंकेत, तर एक शतक दक्षिण आफ्रिकेत झळकावण्यात आले होते.

4. कसोटी क्रिकेटमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची मोईन अलीची ही पाचवी वेळ आहे. आतापर्यंत इंग्लंडच्या 10 फिरकीपटूंनी अशा कामगिरी केलेली आहे. 

5. आतापर्यंत क्रिकेटविश्वातील आठ कसोटीपटूंनी विराट कोहलीपेक्षा कमी डावांमध्ये 6000 धावांचा टप्पा पार केला आहे. या यादीमध्ये सर डॉन ब्रॅडमन (68 डाव), गॅरी सोबर्स (111 डाव), स्टिव्हन स्मिथ (111 डाव), वॅली हॅमोंड (114 डाव), लेन हटन (116 डाव), केन बर्रिग्टंन (116 डाव), कुमार संगकारा (116 डाव), सुनिल गावसकर (117 डाव) हे फलंदाज कोहलीच्या पुढे आहेत.

6. कसोटी क्रिकेटमधील चेतेश्वर पुजाराचे हे 15 वे शतक आहे. या शतकासह पुजाराने गुंडप्पा विश्वनाथ (14 शतकं) यांना मागे टाकले आहे. 

7. पहिल्या डावात शून्यावर बाद होण्याआधी रिषभ पंत तब्बल 29 चेंडू खेळला. या कामगिरीसह त्याने इरफान पठाण आणि सुरेश रैना यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. इरफान पठाणने 2005 मध्ये बंगळुरु कसोटी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध आणि सुरेश रैनाने 2011 साली ओव्हल कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध 29 चेंडू खेळले होते. 

8. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 17 डावांमध्ये मोईन अलीने भारताविरुद्ध 34 बळी घेतले आहेत. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध गेल्या 5 वर्षांत 42 बळी घेतले आहेत.

9. चेतेश्वर पुजारा तब्बल 56 महिन्यांनी आशिया खंडाबाहेर खेळत आहे. त्याने 2013मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे शेवटचे शतक झळकावले होते.  


​ ​

संबंधित बातम्या