भारताच्या वेगवान माऱ्याने इंग्लंड अडचणीत 

सुनंदन लेले
Thursday, 30 August 2018

अनेक वेळा चकत असून ऍलिस्टर कुक खेळपट्टीवर उभा होता. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेला जॉनी बेअरस्टॉ जास्त छाप पाडू शकला नाही. बुमराने त्याला रिषभ पंतकडे झेल द्यायला भाग पाडले. कुकचा अडथळा हार्दिक पंड्याने दूर केला. पंड्याचा टप्पा पडून बाहेर जाणारा चेंडू हलकेच मारायचा प्रयत्न कुकचा चुकला आणि तिसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीने वेगवान झेल पकडला. 

साऊदम्प्टन (लंडन) : भारतीय वेगवान गोलंदाजांनी पुन्हा एकदा परिपूर्ण गोलंदाजी करताना आपला दरारा दाखवून दिला. चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीपर्यंत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला अडचणीत आणले होते. त्यांचे सहा फलंदाज तंबूत परतले असून, धावफलकावर केवळ 139 धावा लागल्या आहेत. मोईन अली आणि सॅम करन हे अष्टपैलू खेळाडू खेळपट्टीवर टिकून आहेत. 

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडने संघात अपेक्षित दोन बदल केले. कोहलीने मात्र, 38 सामन्यानंतर प्रथमच आधीच्या सामन्यातील संग कायम ठेवला. जसप्रीत बुमराने डावखुऱ्या किटन जेनिंग्जला टप्पा पडल्यावर बाहेर जाणाऱ्या चेंडूचा भडिमार करून सतवाले. अशा वेळी अचानक आत आलेल्या चेंडूने जेनिंग्जला चकवले. चेंडू बाहेर जाणार म्हणून त्याने तो सोडला आणि चेंडू त्याच्या पायावर आदळला. जेनिंग्ज प्रमाणे इशांतने कर्णधार ज्यो रुटला पायचित करून भारताच्या वर्चस्वाचा मार्ग मोकळा केला. संघाच्या दोन धावांवर जीवदान मिळालेला रुट वैयक्तिक दोन धावांवर बाद झाला. 

अनेक वेळा चकत असून ऍलिस्टर कुक खेळपट्टीवर उभा होता. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेला जॉनी बेअरस्टॉ जास्त छाप पाडू शकला नाही. बुमराने त्याला रिषभ पंतकडे झेल द्यायला भाग पाडले. कुकचा अडथळा हार्दिक पंड्याने दूर केला. पंड्याचा टप्पा पडून बाहेर जाणारा चेंडू हलकेच मारायचा प्रयत्न कुकचा चुकला आणि तिसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीने वेगवान झेल पकडला. 

दुसऱ्या सत्रात भारतासमोर बेन स्टोक्‍स आणि जोस बटलर या जोडीचे आव्हान होते. मात्र, शमीने आपल्या अचूक माऱ्याने या दोघांचाही अडसर दूर केला. चहापानाअगोदर एक तास इंग्लंड संघाचा डाव संपवण्याकरता करायला पाहिजे ते प्रयत्न झाले नाहीत. त्यावेळी भारतीय गोलंदाजांनी मारा काहीसा आखूड टप्प्याचा आणि स्टंप बाहेर केला. कोहलीने मुख्य गोलंदाजांना चेंडू सोपवण्यापेक्षा पंड्यावर विश्‍वास ठेवला ज्याचा फायदा सॅम करनने फटकेबाजी करून घेतला. करन - मोईन अलीने संघ अडखळत असताना एक तास लढत देत अर्धशतकी भागीदारी केली.

​ ​

संबंधित बातम्या