मॉर्गनच्या टोपीवर पुन्हा दिसली टोपी; स्टाईल नव्हे यामागे दडलंय खास कारण

सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 16 March 2021

क्षेत्ररक्षण करत असताना इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन याच्या डोक्यावर टोप्या दिसत होत्या. सामन्यानंतर या डबल टोपीची सोशल मीडियावर भन्नाट चर्चा होती. 

अहमदाबाद - नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० मालिका सुरु आहे. पाहुण्या इंग्लंड संघानं पहिला टी-२० सामना जिंकून मालिकेची भन्नाट सुरुवात केली होती. तर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघानं दणक्यात पुनरागमन केलं. दुसऱ्या सामन्यात इशान किशन आणि विराट कोहली यांच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर भारतानं साहेबांना धूळ चारली. या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन याच्या डोक्यावर टोप्या दिसत होत्या. सामन्यानंतर या डबल टोपीची सोशल मीडियावर भन्नाट चर्चा होती. याआधी युएईमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यातही मॉर्गनच्या डोक्यावर टोपीवर टोपी दिसली होती. यामागील कारण समोर आलं आहे. 

मागील सहा ते सात महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली होती. यावेळी खेळाडूंच्या डोक्यावर टोपीवर टोपी अनेकदा दिसून आली. मात्र, लक्ष वेधलं ते इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन यानं. यामागील नेमकं कारण काय असावं? असा प्रश्न तुमच्यासारख्या अनेक क्रीडा प्रेमींना पडला असेल. तर जाणून घेऊयात यामीगल नेमकं कारण काय आहे?

हे वाचा - महिला ठरणार क्रिकेटच्या मैदानातील खरी वाघीण; पुरुषांना देणार ट्रेनिंग

आयसीसीच्या नव्या नियमांमुळे मैदानात आजकाल खेळाडूंच्या डोक्यावर एकापेक्षा जास्त टोप्या दिसून येत आहेत. कोरोना विषाणूनं आपल्या आयुष्यात बरेच बदल केले आहेत. यामध्ये क्रीडा प्रकारही मागे राहिले नाहीत. कोरोना महामारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात करण्यापूर्वी आयसीसीनं संघाना आणि खेळाडूंना काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच खेळाडू या नियमांचं पालन करत आहेत. आयसीसीच्या नियमांप्रमाणे कोणताही खेळाडू पंचाला स्पर्श करु शकत नाही. खेळाडू आणि पंच मैदानावर सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) पालन करतील. खेळाडू पंचाकडे टॉवेल, स्वेटर, चश्मा अथवा टोपी ठेवण्यासाठी देऊ शकत नाही. त्यामुळे गोलंदाजाची टोपी अथवा इतर साहित्या संघातील इतर खेळाडूंकडे असते. त्यामुळे क्षेत्ररक्षण करताना एखाद्या खेळाडूच्या डोक्यावर दोन टोप्या दिसून येतात. आयसीसीच्या नियमांप्रमाणे चेंडूला हात लावताना पंचाला ग्लोज घालणं बंधणकारक आहे. त्याशिवाय कोणत्याही खेळाडू चेंडूवर लाळ (थूंकी) लावू शकत नाही. तसे जाणूनबूजून केल्याचं आढळल्यास कारवाई करण्यात येते.

हे वाचा - "ओय, बॅट दिखा"; इशान किशनने सांगितला विराटबद्दलचा मजेशीर किस्सा

कोरोना महामारीच्या आधी गोलंदाजी करण्यापूर्वी खेळाडू आपली टोपी, चश्मा अथवा स्वेटरसारख्या गोष्टी पंचाकडे सांभाळण्यास देत होते. मात्र, आता आयसीसीनं नियमांत बदल केल्यामुळे या गोष्टी संघातील इतर खेळाडूंना सांभाळाव्या लागत आहेत. त्यामुळे मॉर्गनप्रमाणे इतर काही खेळाडूंच्या डोक्यावर एकापेक्षा जास्त टोप्या दिसून येतात. कोरोना काळात झालेल्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्या मालिकादरम्यान कॅरेबियन खेळाडू रहकीम कॉर्नवॉल स्लीपमध्ये पाच-पाच टोप्या घालून उभा असल्याचं पाहायला मिळालं. आता ९ एप्रिलापासून सुरु होणार्या आयपीएल सामन्यादरम्यानही अनेक खेळाडू दोन टोप्या घालून मैदानावर दिसू शकतात.


​ ​

संबंधित बातम्या