INDvsENG : टीम इंडियाच्या मिटींगमध्ये झाली शेतकरी आंदोलनाची चर्चा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 4 February 2021

तत्पूर्वी विराट कोहली , सचिन तेंदुलकर, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यासह दिग्गज क्रिकेटर्संनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देणाऱ्या अमेरिकन पॉप सिंग रिहानाला चांगलेच धारेवर धरले होते.

Team India Discussed Farmers Protest : भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईत रंगणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीमधील सहकाऱ्यांनी शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा केली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने यासंदर्भात माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहाना हिच्या ट्विटनंतर देशात मागील दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या आंदोलनात क्रिकेटर्संनीही उडी घेतल्याचे पाहायला मिळाले. #togetherindia च्या माध्यमातून क्रिकेटर्संनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर भाष्य करत आहेत.  

चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात संघातील खेळाडूंनी आपापली मते मांडली. यासंदर्भात नेमकी कोणती चर्चा झाली यासंदर्भात कोहलीने सविस्तर माहिती मात्र दिलेली नाही. ऑनलाईन पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला की, टीम सहकाऱ्यांसोबत झालेल्या मिटींगमध्ये  शेतकरी आंदोलनासंदर्भात थोडावेळ चर्चा केली. यावेळी सर्वच खेळाडूंनी भाग घेतला.  

कंगनाची रोहित विरोधात बोलंदाजी; ट्विटरने दिला 'नो बॉल'

तत्पूर्वी विराट कोहली , सचिन तेंदुलकर, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यासह दिग्गज क्रिकेटर्संनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देणाऱ्या अमेरिकन पॉप सिंग रिहानाला चांगलेच धारेवर धरले होते. भारत देशांतर्गत समस्येवर तोडगा काढण्यासाठी सक्षम आहे, अशा आशयाच्या संदेश क्रिकेटर्संनी दिला होता.  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला शुक्रवारी 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. चार सामन्यांपैकी पहिले दोन कसोटी सामने चेन्नईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. पहिला कसोटी सामना हा प्रेक्षकांशिवाय रंगणार असून दुसऱ्या कसोटी सामन्याला 50 टक्के लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे.   


​ ​

संबंधित बातम्या