भारतीय विकेट किपर 'बेस्ट बेबीसिटर'; जाणून घ्या चर्चेमागचे कारण

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 25 March 2021

भारतीय विकेट किपर नेहमीच सर्वोत्तम बेबीसिटरची भूमिका बजावण्यात सक्षम असतात. 

भारतीय संघाकडून दमदार कामगिरीने चर्चेत राहणारे मॉडर्न क्रिकेटर मैदानाबाहेरील काही घडनामुंळेही चर्चेत येत असतात. टी-20 मालिकेतील फ्लॉपशोनंतर वनडेत विकेट किपर फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवलेला लोकेश राहुलही सध्या एका विशेष कारणामुळे चर्चेत आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो शेअर केलाय. यात संघातील अन्य सहकाऱ्यांसोबत केएल राहुलही उभा असल्याचे दिसते. या फोटोत केएल राहुलने हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्या घेऊन त्याने फोटोला पोझ दिली आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटर वासीम जाफर याने या फोटोवरुन केएल राहुलची चांगलीच गंमत केली आहे. 

रवि शास्त्री यांचे फोटोवाले ट्विटर शेअर करत जाफरने केएल राहुलकडे लक्षवेधण्याचा प्रयत्न केलाय. त्याने लिहिलंय की, बघा बेटा अगस्त्याला राहुलच्या कडेवर आहे. भारतीय विकेट किपर नेहमीच सर्वोत्तम बेबीसिटरची भूमिका बजावण्यात सक्षम असतात, असा उल्लेखही जाफरने आपल्या ट्विटमध्ये केलाय. जाफरच्या या ट्विटमागे पंतची कहाणीही दडली आहे. 2018-19 मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. यावेळी रिषभ पंतने पेनच्या मुलासोबत खेळतानाचा फोटो व्हायरल झाला होता. पेनची पत्नी बोनी हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन रिषभ पंतचा आणि आपल्या बेबीचा फोटो शेअर केला होता. या फोटोला तिने 'बेस्ट बेबीसिटर ऋषभ पंत।' असे कॅप्शन दिले होते.

INDvsENG: कोरोना टेस्टनंतर रोहितनं पंतला अशी दिली रिअ‍ॅक्शन (VIDEO)

यावेळी पंतची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता केएल राहुल चर्चेत आला आहे. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत लोकेश राहुला पुन्हा एकदा विकेट किपर बॅट्समन म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. आयपीएलमध्ये केएल राहुल बॅटिंगसोबतच विकेटमागचीही भूमिका बजावताना दिसते. याच अनुषंगाने जाफरने टीम इंडियाच्या विकेट किपर बाळाचे संगोपन करण्यात सर्वोत्तम असतात, असे गंमतीशीर ट्विट केले आहे.     

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेत लोकेश राहुलला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. मात्र वनडे सामन्यात त्याने आपल्यातील धमाका दाखवून दिला. पहिल्या वनडे सामन्यात त्याने नाबाद अर्धशतकी खेळी केली होती. या सामन्यात त्याने कृणाल पांड्यासोबत केलेल्या शतकी भागीदारीमुळे टीम इंडियाने 317 धावांपर्यंत मजल मारली होती. 


​ ​

संबंधित बातम्या