पुण्याच्या वनडेत सचिन-सेहवाग करणार ओपनिंग; Memes का होतायत व्हायरल

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 23 March 2021

वनडेसाठी टीम इंडियात प्रसिद्ध कृष्णा क्रृणाल पांड्या आणि टी-20 मालिकेत दमदार पदार्पण करणाऱ्या सुर्यकुमार यादव यांना संधी देण्यात आली आहे.

कसोटी आणि टी-20 मालिका विजयानंतर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगणाऱ्या वनडे मालिकेतील विजयासह टीम इंडिया पाहुण्या इंग्लंडला चारीमुंड्या चित करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. भारतीय संघाने ही मालिका जिंकली तर इंग्लंडचा भारत दौरा व्हाईट वॉश ठरेल, असे म्हणता येईल. (मालिकेतील सर्व सामने जिंकले तर व्हाईट वॉश शब्द-प्रयोग केला जातो. त्या अनुषंगाने दौऱ्यातील सर्व मालिका जिंकल्यानंतर दौऱ्यात व्हाइट वॉश म्हणायला काय हरकत आहे. ) वनडेसाठी टीम इंडियात प्रसिद्ध कृष्णा क्रृणाल पांड्या आणि टी-20 मालिकेत दमदार पदार्पण करणाऱ्या सुर्यकुमार यादव यांना संधी देण्यात आली आहे. या तीन गड्यांसाठी हा दौरा महत्त्वपूर्ण असेल. या तिघांचे वनडेत पदार्पण होणार की आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. 

तत्पूर्वी या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर एक मीम्स चांगलीच व्हायरल होत आहे. पुण्यात रंगणाऱ्या वनडे सामन्यात सचिन-सेहवाग जोडी भारताच्या डावाला सुरुवात करेल, असे स्पष्टीकर विराट कोहलीने दिले आहे, अशी एक मीम्स प्रचंड चर्चेत आहे. कोणतीही मीम्स होण्यामागे एक कारण असते. आता या मीम्समागचे नेमके कारण काय? असा प्रश्न कदाचित तुम्हालाही पडेल. यामागे दोन कारणे दडलेली असू शकतात. पहिले म्हणजे रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या माध्यमातून विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी आपले पुराने तेवर पुन्हा जागृत केले. आणि त्याला जोड मिळते ती म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टी-20 संघात ओपनिंगमध्ये झालेले बदल. 

May be an image of one or more people, people playing sports and text that says 'IPAPEL 10 TEROULK Virat Kohli confirms that Sachin and Sehwag will open for India in the 1st ODI against England'

भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्या रोहित शर्माला विश्रांती दिली होती. हा निर्णय सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा असा होता. माजी क्रिकेटर आणि इडिंया लिंजेंड्सच्या डावाची सुरुवात करणाऱ्या विरेंद्र सेहवागने हिटमॅनशिवाय मॅच बघणे कठिण असल्याचे म्हटले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेच्या सुरुवातीला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मा आणि लोकेश राहुल भारतीय डावाची सुरुवात करेल असे म्हटले. पण प्रत्येक्षात मॅचच्या दिवशी वेगळाच सीन पाहायला मिळाला. रोहितला विश्रांती देऊन शिखर धवन आणि केएल राहुलने भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले.

दुसऱ्या सामन्यात युवा ईशान किशन आणि केएल राहुल, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात रोहित- लोकेश राहुल आणि पाचव्या सामन्यात रोहित आणि विराट कोहली यांनी भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. अखेरचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर टी-20 वर्ल्डकपपर्यंत रोहितसोबत डावाची सुरुवात करेन, असे वक्तव्य विराट कोहलीने केले. या संदर्भातूनच सोशल मीडियावर एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यात इंडिया लिजेंड्सच्या संघाकडून धमाकेदार ओपनिंग करणाऱ्या सचिन-सेहवागचे चित्र पाहायला मिळते. विराटच्या नावाखाली मजेशीर अंदाजातील फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या