INDvsENG : पुजाराची विकेट कल्पनेपलिकडची (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 7 February 2021

भारतीय संघाच्या डावातील 51 व्या षटकात पुजाराने डोम बेसच्या चेंडूवर पुल फटका मारण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट चेंडूवर चौकार मिळेल, असाच हा फटका होता.

India vs England: चेन्‍नई कसोटीत (Chennai Test) आघाडी कोलमडल्यानंतर भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने नावाला साजेसा खेळ केला. मोठ्या खेळीच्या दिशेने वाटचाल करत असताना तो अजब गजब पद्धतीने बाद झाल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेट चाहत्यांनी सोडा खुद्द पुजारानेही आपण असे आउट होऊ अशी कल्पना केली नसेल.

डॉम बेसच्या चेंडुवर पुजाराने एक जोरदार फटका खेळला. त्याने टोलवलेला चेंडू शॉर्ट लेगच्या फिल्डरच्या खांद्याला लागला आणि शॉर्ट मिड विकेटला उभ्या असलेल्या रॉय बर्न्सच्या हातात विसावला.  

INDvsENG: अजिंक्यला फेल ठरवणारा रुटचा अप्रतिम झेल पाहिलात का?

भारतीय संघाच्या डावातील 51 व्या षटकात पुजाराने डोम बेसच्या चेंडूवर पुल फटका मारण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट चेंडूवर चौकार मिळेल, असाच हा फटका होता. पण काहीतरी विपरितच घडले आणि त्याला मैदान सोडावे लागले. आपल्या संयमी स्वभावाने ओळखला जाणारा पुजारा विकेट गमावल्यानंतर चिडलेलेही पाहायला मिळाले. त्याने पॅडवर बॅट आदळत राग व्यक्त केला.

 INDvsENG : पंत-पुजाराची शतकी भागीदारी थोडासा दिलासा देणारी

चेन्नईत सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पुजाराने 143 चेंडूत 74 धावांची खेळी केली. आपल्या या उपयुक्त खेळीत त्याने 11 चौकार खेचले. रिषभ पंतसोबत त्याने 119 धावांची भागीदारीही रचली. तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने धावफलकावर 6 बाद 257 धावा केल्या होत्या.  
 


​ ​

संबंधित बातम्या