INDvsENG : दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, भरवशाचा गडी मालिकेतूनच आउट

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 11 February 2021

मालिकेत कमबॅक करण्याच्या आव्हानासोबतच प्लेइंग इलेव्हनचा तेढ सोडवण्याचे मोठे कोडे टीम इंडियासमोर असेल.

इंग्‍लंड (England) विरुद्धच्या दुसऱ्या चेन्नई कसोटी सामन्यापूर्वी टी इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील अष्टपैलू रविंद्र जडेजा उर्वरित कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे समोर येत आहे. पहिल्या पराभवाची जखम ताजी असताना टीम इंडियावर हे संकट ओढावले आहे. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार,  भारतीय  संघातील अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) इंग्लंड विरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून आउट झाला आहे. 
ऑस्‍ट्रेलिया दौऱ्यावर त्याला दुखापत झाली होती.

अहमदाबादच्या कसोटी सामन्यात तो पुनरागमन करेल, अशी आशा होती. मात्र त्याला दुखापतीतून सावरण्यास आणखी काही वेळ विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे विराट सेनेचे टेन्शन वाढले आहे. बंगळुरु स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमदीत त्याच्या फिटनेसवर लक्ष्य ठेवण्यात येते होते. मात्र तो खेळणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. फलंदाजीवेळी झालेल्या दुखापतीनंतर त्याच्यावर ड्रेसिंगरुमध्येच बसण्याची वेळ आली होती. जडेजाने  2016 मध्ये चेन्नईच्या मैदानात झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाने टीम इंडियाची ताकद निश्चितच वाढली असती. इंग्लंड विरुद्धच्या चेन्नई कसोटीत जडेजाने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 7 विकेट घेतल्या होत्या. एवढेच नाही तर फलंदाजीवेळी पहिल्या डावात त्याने अर्धशतकी खेळीही साकारली होती 

पहिल्या पराभवानंतर टीम इंडियासमोर प्लेइंग इलेव्हनचा पेच

विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पहिल्या कसोटीत 227 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. मालिकेत कमबॅक करण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर असून प्लेइंग इलेव्हनचा मोठा प्रश्नही संघ व्यवस्थापनापुढे असेल. कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. 


​ ​

संबंधित बातम्या