Ind vs Eng Video: एक झेल सोडला तर एक पकडला; सूर्यकुमारची तारेवरची कसरत

सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 14 March 2021

दुसऱ्या टी२० सामन्यात अक्सर पटेलच्या जागी संघात सूर्यकुमार यादवला संधी मिळाली.

Ind vs Eng 2nd T20 Video: भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या मोटेरा मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतापुढे १६५ धावांचे आव्हान ठेवलं. सलामीवीर जेसन रॉयची ४६ धावांची खेळी आणि इतर खेळाडूंच्या छोटेखानी खेळी यांच्या जोरावर इंग्लंडने २० षटकात ५ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. आपला पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवला सामन्यात तारेवरची कसरत करावी लागली.

सूर्यकुमारला यादवला फिल्डिंगसाठी सीमारेषेवर ठेवण्यात आले होते. त्यावेळी जॉनी बेअरस्टोने वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर हवेत उंच फटका मारला. चेंडू अडवण्याचा प्रयत्न सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर केला पण त्याला झेल टिपता आला नाही. त्यानंतर पुढच्याच षटकात सुंदरच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा बेअसस्टोने हवेत फटका मारला. त्यावेळी चेंडू हवेत उंच गेला आणि सूर्यकुमारने पुन्हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या हातावर टप्पा पडून झेल सुटतो की काय असं वाटत असतानाच त्याने झेल टिपला.

Brought to you by --

Brought to you by

दरम्यान, इंग्लंडच्या डावाची सुरूवात खराब झाली पण जेसन रॉयने आधी डेव्हिड मलानबरोबर, नंतर जॉनी बेअरस्टोसोबत भागीदारी करत संघाला शंभरीपार पोहोचवले. जेसन रॉयचं सलग दुसरं अर्धशतक हुकलं. पहिल्या सामन्यात ४९ तर आजच्या सामन्यात तो ४६ धावांवर बाद झाला. त्यानंतर मॉर्गन आणि स्टोक्स यांनी फटकेबाजी करत संघाला १६४पर्यंत मजल मारून दिली. भारताकडून सुंदर आणि शार्दुलने २-२ तर चहल, भुवनेश्वरने १-१ गडी टिपला.


​ ​

संबंधित बातम्या