INDvsENG : अय्यरला सोडावे लागले मैदान, रोहित फिल्डिंगला उतरलाच नाही

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 23 March 2021

फिल्डिंगला मैदानात उतरल्यानंतर इंग्लंडच्या डावातील आठव्या षटकात श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला.

India vs England, 1st ODI : इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात फिल्डिंगवेळी टीम इंडियाला मोठा धक्का देणारी गोष्ट घडली आहे. सध्याच्या घडीला कोणत्याही क्रमाकांवर खेळण्यास सक्षम असलेल्या श्रेयस अय्यरवर दुखापतीमुळे  मैदान सोडण्याची वेळ आलीय. त्याच्या दुखापतीसंदर्भात कोणतीही अधिकृत अपडेट आली नसली तरी त्याने मैदान सोडल्यामुळे अय्यरच्या चाहत्यांसह टीम इंडियाची चिंता वाढवणारे चित्र निर्माण झाले आहे. पहिल्या वनडे सामन्यात फलंदाजीमध्ये श्रेयस अय्यर फार काळ मैदानात थांबला नाही. 9 चेंडूत 6 धावा करुन तो बाद झाला. 

फिल्डिंगला मैदानात उतरल्यानंतर इंग्लंडच्या डावातील आठव्या षटकात श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इंग्लिश फलंदाजाने मारलेला चेंडू अडवण्याच्या प्रयत्न करताना त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. या घटनेनंतर त्याच्या जागी शुभमन गिल फिल्डिंगसाठी आल्याचे पाहायला मिळाले. त्याच्यापूर्वी रोहित शर्माही फिल्डवर उतरला नसल्याचे दिसून आले. मार्क वूडचा चेंडू कोपराला लागल्यामुळे तो मैदानात उतरलेला नाही. 

INDvsENG गब्बर नवव्यांदा झाला नर्व्हस नाइंटीचा शिकार

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरने 21 वनडे आणि 29 टी 20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. 26 वर्षीय अय्यरने मागील आयपीएल हंगामात 519 धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर त्याच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स फायनलपर्यंत पोहचला होता. अय्यरची दुखापत गंभीर असली तर दिल्लीच्या ताफ्यातही टेन्शन वाढू शकते.  

IND vs ENG: भावाने भावाला दिली वनडे कॅप; कृष्णालाही 'प्रसिद्धी'

वनडे सामन्यापूर्वीच इंग्लिश काउंटी टीम लंकाशायरने श्रेयस अय्यरला करारबद्ध केले होते. यंदाच्या वर्षी आयोजित रॉयल लंडन कप स्पर्धेत अय्यर लंकाशायरचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. 15 जुलै रोजी अय्यर मर्यादित 50 षटकाच्या इंग्लंडमधील स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठीही टीम इंडियातील तो एक हुकमी एक्का असेल. त्यामुळेच त्याची दुखापत कितपत गंभीर आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या