"चेंडू फिरू लागल्यावर रडण्याचीच सवय"

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 March 2021

चेंडूने फिरक घेतल्यावर सगळे जण रडायला सुरुवात करतात. मला तर खेळपट्टीत काहीच गैर वाटले नाही, असे लिऑनने सांगितले.

मेलबर्न : चेंडू पहिल्या दिवसापासून फिरक घेऊ लागला, की खेळपट्टीवरून रडण्यास सुरुवात होते; पण चेंडू सीम झाल्यावर खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी कमी धावात बाद झाले, तर कोणाची तक्रार नसते, असे ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लिऑन याने सुनावले.

चेंडू चांगलीच फिरक घेणाऱ्या अहमदाबाद कसोटीत इंग्लंडचा डाव 112 आणि 81 धावांत बाद झाल्यावर खेळपट्टीस मायकेल वॉन, अँड्य्रू स्ट्रॉस, अलिस्टर कूक यांनी लक्ष्य केले; पण लिऑनला हे मान्य नाही. वेगवान गोलंदाजीस अनुकूल होणाऱ्या खेळपट्टीवर संघ 47, 60 धावांत बाद होतात, त्या वेळी कोणी खेळपट्टीबद्दल बोलत नाही. चेंडूने फिरक घेतल्यावर सगळे जण रडायला सुरुवात करतात. मला तर खेळपट्टीत काहीच गैर वाटले नाही, असे लिऑनने सांगितले.

ICC Test Rankings : रोहितची सर्वोत्तम रँकिंगला गवसणी; अश्विनलाही झाला फायदा

फिरकी गोलंदाजांचा टप्पा पडतो, त्या भागात खेळपट्टीस तडे गेले होते. तेथून धूळही ऊडत होती. ही 1935 पासूनची सर्वात कमी वेळ चाललेली कसोटी ठरली. सामन्यात बाद झालेल्या 30 पैकी  28 फलंदाजांना फिरकी गोलंदाजांनी बाद केले. खेळपट्टी करण्याचा अनुभव असलेल्या लिऑनने अहमदाबादची खेळपट्टी तयार केलेल्यांनी सिडनीतील खेळपट्टी तयार करावी, अशी माझी अपेक्षा आहे.

इंग्लंडने या कसोटीसाठी चार मध्यमगती गोलंदाजांची निवड केली. हीच या सामन्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. यापेक्षा मी अधिक काही बोलण्याचीही गरज नाही, असेही त्याने आवर्जून सांगितले. अहमदाबादच्या कसोटीचा मी रात्रभर जागून आनंद घेतला. हा सामना बघताना खूप मजा आली. त्या क्‍यूरेटरना सिडनीला कसे आणता येईल, याचा मी विचार करीत आहे, असेही नॅथन लिऑन याने म्हटले आहे. भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या