Ind vs Eng: गुजरात अन् वडापाव??; रोहित शर्माचा Video व्हायरल

सकाळ स्पोर्ट्स
Monday, 15 March 2021

इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्यात आले.

अहमदाबाद (Ind vs Eng 2nd T20): गुजरातच्या मोटेरा मैदानावर झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारत विजयी झाला. कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर इशान किशन या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडवर ७ गडी राखून विजय मिळवला. सलामीवीर जेसन रॉयच्या ४६ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडच्या फलंदाजांनी २० षटकात १६४ धावा केल्या. १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या इशान किशन दणकेबाज सुरूवात केली. तर विराटने नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. मुंबईकर रोहित शर्माला सलग दुसऱ्या सामन्यात संघाबाहेर ठेवण्यात आले. याच सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.

ही बातमी वाचा- बुमराह झाला महाराष्ट्राचा जावई, संजनानं केलं 'क्लीन बोल्ड'

भारतीय संघात मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंना टी२० पदार्पणाची संधी देण्यात आली. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोघांना संघात स्थान देण्यात आले. पण मुंबईकर रोहित शर्माला मात्र पुन्हा एकदा संघातून डावलण्यात आलं. रोहित शर्माने कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करून दाखवली असूनही त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. या सामन्यात भारत फिल्डिंग करत असताना एक मजेशीर प्रसंग घडला आणि तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्या व्हिडीओमध्ये रोहित काही तरी खाताना दिसत होता. जो व्हिडीओ व्हायरल झाला त्यात या व्हिडीओसोबत एक मजेशीर कॅप्शनदेखील व्हायरल झालं. "रोहित संघाबाहेर होता त्याचं कारण वडापाव जास्त महत्त्वाचा आहे", असं त्या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं. परंतु, रोहित नक्की काय खात होता हे कळू शकलेलं नाही.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, रोहित शर्माला संघाबाहेर ठेवल्यानंतर दिग्गज खेळाडूंनी विराट आणि संघ व्यवस्थापनावर टीका केली होती. रोहितला टीमच्या बाहेर ठेवण्यावरून वीरेंद्र सेहवाग आणि अजय जाडेजा या दोघांनी नाराजी व्यक्त केली होती. रोहित खेळणार नसेल तर टीव्हीवर मॅच बघण्यात अर्थ नाही, अशा आशयाचं मत सेहवागने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं होतं. तर, "जगात कोणत्याही बॅट्समनला विश्रांती नको असते. हा सगळा फॉर्मचा खेळ असतो आणि जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये असता तेव्हा तुम्हाला सतत संधी दिली पाहिजे. टेस्ट सीरिजमध्ये नेमकी हीच चूक इंग्लंडने केली होती. त्यांनी त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली आणि त्याचा फटका त्यांना बसला', असं अजय जाडेजा म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या