INDvsENG: कोरोना टेस्टनंतर रोहितनं पंतला अशी दिली रिअ‍ॅक्शन (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 25 March 2021

राज्य सरकारने वनडे मालिका प्रेक्षकाविना खेळवण्याची परवानगी दिली आहे. दोन्ही खेळाडूंना कोरोनाच्या नियमावलीचे पालन करावे लागत आहे. 

कोरोनाची लस आली असली तरी या संकटातून आपली अद्याप सुटका झालेली नाही. देशात कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असून पुण्यातील आकडा हा सर्वाधिक आहे. दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका पुण्यातील स्टेडियवरच खेळवण्यात येत आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा पाहून राज्य सरकारने वनडे मालिका प्रेक्षकाविना खेळवण्याची परवानगी दिली आहे. दोन्ही खेळाडूंना कोरोनाच्या नियमावलीचे पालन करावे लागत आहे. 

दुसऱ्या वनडेपूर्वी नियमानुसार खेळाडूंची कोरोना चाचणी झाली. कोरोना टेस्ट करतानाचा रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे. रोहितची टेस्ट सुरु असताना पंतने व्हिडिओ केल्याची चर्चा आहे. यष्टीमागे बडबड करणारा पंत इथही शांत बसलेला नाही. त्याने रोहितला 'कैसे हो भैय्या असा प्रश्न विचारला. यावर रोहित शर्माने हातवारे करत ओके अशी रिअ‍ॅक्शन  दिल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यावर अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसते.  

...म्हणून कृणाल पांड्या ड्रेसिंग रुममध्ये घेऊन आला होता वडिलांची कपडे

पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्माने धवनसोबत अर्धशतकी भागीदारी केली होती. मैदानात स्थिरावलेल्या रोहितला मोठी खेळी करण्यात अपयश आले. या सामन्यात मार्क वूडचा चेंडू त्याच्या कोपराला लागला होता. त्यामुळे तो फिल्डिंगला मैदानात उतरला नाही. त्याच्याजागेवर सुर्यकुमार फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. दुखापत गंभीर नसली तरी दुसऱ्या वनडेमध्ये प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याबाबत संभ्रम आहे.  भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना 26 मार्चला खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यातील 66 धावांनी मिळवलेल्या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  


​ ​

संबंधित बातम्या