INDvsENG : पंत पुन्हा ठरला कमनशिबी; नर्व्हस नाइंटीचा चौकार!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 7 February 2021

ब्रिस्बेनच्या मैदानात पंतने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. या सामन्यात त्याने नाबाद 89 धावांची खेळी केली होती. 

Rishabh Pant Hits Fifty In T20 style in chennai test: भारतीय संघाचा यष्टिरक्षक आणि फलंदाज रिषभ पंतने चेन्नई कसोटीत आक्रमक खेळ दाखवला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना बेसने त्याला बाद केले. बाद होण्यापूर्वी पंतने अर्धशतकाला गवसणी घातली. त्याने अवघ्या 40 चेंडूत  4 चौकार आणि 4 षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले. तो शतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला. कसोटी कारकिर्दीत चौथ्यांदा तो नर्व्हस नाइंटीचा शिकार झाला आहे. 

2018 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यात तो दोन वेळा नर्व्हस नाइंटीचा शिकार झाला होता. बॉर्डर गावसकर ट्रॉफीत त्याने धमाकेदार कामगिरी नोंदवली. भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या पंतचे सिडनी कसोटीतही शतक हुकले होते. सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात 36 धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने दमदार कमबॅक करत कसोटी अनिर्णित राखण्यात मोलाचा वाटा उचलला होता. यावेळीही तो फिरकीपटू लायनच्या जाळ्यात अडकला. 97 धावांवर बाद झालेल्या पंतचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले होते. 

INDvsENG: अजिंक्यला फेल ठरवणारा रुटचा अप्रतिम झेल पाहिलात का?

इंग्लंड विरुद्धच्या चेन्नई कसोटीत त्याने धमाकेदार फलंदाजी केली. आपल्या आक्रमक शैलीत त्याने इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घेतला. 91 धावांवर खेळत असताना डॉम बेसच्या जाळ्यात तोही फसला.जॅक लिचने त्याचा झेल टिपला. पंतने 88 चेंडूच्या खेळीत 9 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार खेचत 91 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट हा एकदिवसीय सामन्यात शोभेल असा 103.44 इतका होता. त्याने पुजारासोबत केलेल्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाचा डाव बऱ्यापैकी सावरण्यात मदत झाली. ब्रिस्बेनच्या मैदानात पंतने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. या सामन्यात त्याने नाबाद 89 धावांची खेळी केली होती. 

घरच्या मैदानात तिसऱ्यांदा नाइंटीचा शिकार

घरच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध राजकोटच्या मैदानात पहिल्या डावात 92 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर हैदराबाद कसोटीमध्येही तो 92 धावांवरच बाद झाला होता. चेन्नईच्या मैदानात तो 91 धावा करुन तंबूत परतला. 
 


​ ​

संबंधित बातम्या