Covid 19 : टीम इंडियाचे कोच शास्त्रींनीही घेतला पहिला डोस

OK
Tuesday, 2 March 2021

मेडिकल टीम आणि वैज्ञानिकांचे धन्यवाद! लस टोसणाऱ्या कांताबेन आणि त्यांच्या टीमच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.  

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मंगळवारी अहमदाबाद येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस घेतली. 58 वर्षीय शास्त्रींनी पहिला डोस घेतल्यानंतर रुग्णालय प्रशासनाचे आभारही मानले. शास्त्रींनी ट्विटरच्या माध्यमातून पहिला डोस घेतल्याचा फोटो शेअर केलाय. त्यानंतर नेटकऱ्यांनी शास्त्रींना चांगले धारेवर धरले असून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.  रवि शास्त्री यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, कोविड 19 लशीचा पहिला डोस घेतला. मेडिकल टीम आणि वैज्ञानिकांचे धन्यवाद! लस टोसणाऱ्या कांताबेन आणि त्यांच्या टीमच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.  

सोमवारपासून देशात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झालीय. ज्येष्ठ नागरिक तसेच गंभीर स्वरुपात आजार असलेल्या लोकांना दुसऱ्या टप्प्यात लस देण्यास सुरुवात झाली आहे. शास्त्रींनी लस घेतल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोलही केल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट संघासोबत असणाऱ्या आणखी कोणी लस घेतली आहे का? यासंदर्भात कोणतही माहिती समोर आलेली नाही. याशिवाय लवकरच संघातील खेळाडूही लस घेतली, असे संकेत शास्त्रींनी पहिला डोस घेतल्यानंतर दिले आहेत.

रवि शास्त्री यांच्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना अहमदाबादच्या मैदानात रंगणार आहे. यापूर्वीचा सामनाही याच मैदानात खेळवण्यात आला होता. मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी या दौऱ्यादरम्यानच लशीचा पहिला डोस घेतला आहे. रवि शास्त्री सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय दिसतात. 


​ ​

संबंधित बातम्या