पुजाराला अश्विननं दिलं ओपन चॅलेंज; अर्धी मिशी काढायला झालाय तयार

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 26 January 2021

पुजारा आपल्या डिफेन्सिव्ह खेळीनं ओळखला जातो. त्याच्या खेळीचे काहीजण कौतुक करतात तर अनेकांना त्याचा खेळ रटाळ वाटतो. आणि त्याच्यावर टिकाही केली जाते.

भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विनने इंग्लंड दौऱ्यापूर्वी आपल्या सहकाऱ्याबद्दल मोठ वक्तव्य केले आहे. भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यासोबतच्या चर्चेत त्याने पुजाराला अप्रत्यक्ष चॅलेंज दिले आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात मोईन अली किंवा अन्य कोणत्याही फिरकीपटूला पुजाराने पुढे येऊन फटका मारला तर मी अर्धी मिशी काढून मैदानात उतरेल, असे अश्विन म्हणालाय.  

पुजारा आपल्या डिफेन्सिव्ह खेळीनं ओळखला जातो. त्याच्या खेळीचे काहीजण कौतुक करतात तर अनेकांना त्याचा खेळ रटाळ वाटतो. आणि त्याच्यावर टिकाही केली जाते. अश्विनने फलंदाजी कोच विक्रम राठोड यांना पुजाराच्या फलंदाजीसंदर्भात प्रश्न विचारला होता. पुजारा एखाद्या फिरकीपटूला उत्तुंग फटका मारताना आपल्याला पाहायला मिळू शकेल का? असा प्रश्न अश्विनने विचारला होता. पुजारा हवेत फटका मारताना नक्की दिसले. यावर काम सुरु आहे, असे राठोड यांनी सांगितले.  

काय हे ! एका चेंडूवर एक गडी दोनवेळा रन आउट (VIDEO)

पुजाराने गोलंदाजाच्या डोक्यावरुन फटका मारावा यासाठी मी त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न करतोय. पण तो काही ना काही कारण पुढे करुन माझी गोष्ट टाळतोय, असे विक्रम राठोड म्हणाले. यावर अश्विनने पुजाराला ओपन चॅलेंज दिले. मोईन अली किंवा इंग्लंडच्या अन्य कोणत्याही फिरकीपटूला जर त्याने पुढे येऊन फटका खेळला तर मी अर्धी मिशी काढून मैदानात उतरेन, असे अश्विनने म्हटला आहे.   

पुजारानं केलाय असाही पराक्रम; टी20 मध्ये झळकावलं होतं शतक!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चेतेश्वर पुजाराने 271 धावा केल्या होत्या. भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर राहिला. भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयात त्याला मोलाचा वाटा होता. त्यानंतर आता 5 फेब्रुवारीपासून भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे. या मालिकेतही मध्यफळीची मदारही पुजारावर असेल. 
 


​ ​

संबंधित बातम्या