Ind vs Eng: स्टेडियमच्या तिकीट बारीवर तुफान गर्दी; क्रिकेट चाहते विसरले सोशल डिस्टन्सिंगचा नियम

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 12 February 2021

दुसऱ्या सामन्यासाठी स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना प्रत्येक्षात स्टेडियमवर जाऊन सामना पाहता येणार आहे.

India Vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागून आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे.  कोरोनाच्या संकटानंतर प्रेक्षकांसह रंगणारा हा पहिला क्रिकेटचा सामना ठरेल. त्यामुळे अनेकांनी सामन्याची तिकीटे खरेदी करण्यासाठी स्टेडियम बाहेर तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचे तिकीट खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येनं क्रिकेट चाहते स्टेडियम बाहेर जमले होते.

दुसऱ्या सामन्यासाठी स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना प्रत्येक्षात स्टेडियमवर जाऊन सामना पाहता येणार आहे. तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने या सामन्याची तिकीट विक्रीही ऑनलाईन होणार असल्याचे जाहीर केले होते. क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यामुळे स्टेडियमबाहेर रांगा लागल्या. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली, असे तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. गुरुवारी संपूर्ण दिवस चेन्नईच्या स्टेडियम बाहेर सोशल डिस्टन्सिंगच्या फज्जा उडाल्याची चर्चा होती. 

Image

IND vs ENG:टीम इंडियाचे 6 खेळाडू 2 किमी धावण्याच्या टेस्टमध्ये फेल; त्यांना किती वेळ दिला होता माहितेय?

टीएनसीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांनी ऑनलाईन तिकीट बूक केले आहे त्यांना स्टेडियम काउंटरवरुन 11 फेब्रुवारीपासून तिकीट दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. चाहत्यांना सामन्याचे तिकीट मिळणार असे वाटले. त्यामुळे गर्दी झाली, असे त्यांनी सांगितले.  Image

यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पायमल्लीशिवाय रांगेत उभ्या असलेल्या एक क्रिकेट चाहता बेशुद्ध पडल्याची घटनाही समोर आली होती. 13 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना चेन्नईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडच्या संघाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून प्रेक्षकांच्या उपस्थितीत टीम इंडिया पुन्हा जोमाने कमबॅक करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रेक्षक नियमाची अंमलबजावणी कसे करतात यावर देखील सर्वांचे लक्ष असेल. 


​ ​

संबंधित बातम्या