'मुंबई इंडियन्स'च्या दोघांना 'टीम इंडिया'त संधी; इंग्लंडच्या बोलर्सना चॅलेंज

सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 14 March 2021

शिखर धवन आणि अक्षर पटेल या दोघांना संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याजागी या दोघांना संघात स्थान मिळालं.

अहमदाबाद (IND vs ENG) : इंग्लंड विरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये 0-1 पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियानं आज, दोन ताज्या दमाच्या खेळाडूंना संधी दिलीय. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये तुफानी खेळी करणाऱ्या ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी या मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. विशेष म्हणजे, हे दोघेही खेळाडू सोमरच्या बोलर्सना धडकी भरवणारे आहेत. सलामीला केएल राहुल सोबत रोहित शर्मा येणार की, शिखर धवन अशी चर्चा सुरू असताना कॅप्टन विराट आणि कोच रवि शास्त्री यांनी दोन नवे पत्ते खेळले आहेत. टी-20 सारख्या गेम फॉर्मेटमध्ये झटपट रन्स करणं, महत्त्वाचं असतं. पहिल्या मॅचमध्ये स्कोअर बोर्डवर फारशी मोठी संख्या उभारू न शकलेल्या टीम इंडियाला तुफानी खेळी करणाऱ्या खेळाडूंची गरज होती. पण, रोहित शर्मासारखा अनुभवी ऑप्शन असतानाही, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांची निवड केली. 

दोघंही मुंबई इंडियन्सचे

ईशान किशनचा जन्म बिहरमधील पाटणा इथं झाला आहे. सध्या तो झारखंडकडून खेळतो. 2018च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 6.2 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. दरम्यान, सूर्यकुमार यादव हा मुळचा मुंबईचा आहे. आयपीएलमध्ये सुरुवातीला तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळ होता. मात्र, त्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सने खरेदी करून वरच्या फळीत खेळण्याची संधी दिली होती त्यानेही यूएईमधील आयपीएल चांगलीच गाजवली होती.

सामन्याच्या ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा

ईशान किशन सलामीला खेळेल. तर संघात अक्षर पटेलच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली आहे. हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय पदर्पणासाठी तयार आहेत. त्यांनी आयपीएलमध्ये जगातल्या उत्तम बोलर्ससमोर अतिशय चांगली कामगिरी केली आहे. अशा नवख्या खेळाडूंना फारसं काही सांगावं लागत नाही फिल्डवर केवळ त्यांच्या पाठिशी उभं रहावं लागतं. - विराट कोहली, कॅप्टन, टीम इंडिया


​ ​

संबंधित बातम्या