IND vs ENG: विराटनं पुन्हा चूक केली; दुसऱ्या मॅचमध्येही रोहित कट्ट्यावर

सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 14 March 2021

पहिल्या सामन्यात रोहित शर्माला संघाबाहेर बसवण्यात आल्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली होती. तरीदेखील दुसऱ्या सामन्यातही रोहितला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

अहमदाबाद (IND vs ENG): कॅप्टन विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या 'ऑल इज नॉट वेल' अशी परिस्थिती आहे, हे सांगण्याची गरज नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीपासून या दोन्ही खेळाडूंमध्ये काही तरी बिनसलं असल्याचं सगळ्या जगाला दिसलं होतं. त्यानंतरही इंग्लंडची टीम भारतात दाखल झाल्यानंतर टेस्ट मॅचमध्ये विराटनं रोहितला संधी दिली होती. त्यात रोहितनं चांगली कामगिरी केली होती. एका इनिंगमध्ये 150 पेक्षा अधिक आणि एक हाफ सेंच्युरी केली होती. तर, शेवटच्या मॅचमध्ये अडचणीच्या क्षणी रोहितनं संयमी 49 रन्सची खेळी केली होती. त्यानंतरही पहिल्या दोन्ही टी-20 मॅचमध्ये रोहितला जाणीवपूर्वक डाववलं जात असल्याची टीका विराटवर होत आहे. पहिल्या मॅचमध्ये पराभवाची चव चाखल्यानंतरही विराटनं अनुभवी रोहितवर विश्वास टाकलेला नाही. पहिल्या मॅचमध्ये राहुलसोबत शिखर धवनला संधी देण्यात आली होती. त्यानंत १२ बॉलमध्ये केवळ ४ रन्स करून निराशा केली. त्याला संघाबाहेर ठेवून रोहितला पुन्हा सलामीला पाठवलं जाईल असं वाटत असताना, विराटनं सलामीसाठी ईशान किशनवर विश्वास टाकला होता.

IND vs ENG 2nd T20 सामन्याचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा

दिग्गज खेळाडूंनी केली टीका

रोहितला टीमच्या बाहेर ठेवण्यावरून वीरेंद्र सेहवाग आणि अजय जडेजा या दोघांनी विराटच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. रोहित खेळणार नसेल तर टीव्हीवर मॅच बघण्यात अर्थ नाही, अशा आशयाचं वक्तव्य सेहवागनं सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं होतं. तर, जडेजानंही नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, 'जगात कोणत्याही बॅट्समनला विश्रांती नको असते. हा सगळा फॉर्मचा खेळ असतो आणि जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये असता तेव्हा तुम्हाला सतत संधी दिली पाहिजे. टेस्ट सीरिजमध्ये नेमकी हीच चूक इंग्लंडने केली होती. त्यांनी त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली आणि त्याचा फटका त्यांना बसला.'

ही नक्की वाचा- 'मुंबई इंडियन्स'च्या दोघांना 'टीम इंडिया'त संधी; इंग्लंडच्या बोलर्सना चॅलेंज

दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडिया आपल्या सर्वोत्तम ११ खेळाडूंसह मैदानात उतरले, अशी अपेक्षा आहे. रोहित शर्मा पुन्हा त्याच्या पोझिशनला खेळायला येईल, अशी आशा करुया.
- मोहम्मद अझरुद्दीन, माजी कर्णधार, टीम इंडिया


​ ​

संबंधित बातम्या