पुण्यातील वन डे सामन्यांची तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

सलग तीन सामने या मैदानावर होणार असल्याने प्रत्येक सामना हा नव्या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार असल्याचे काकतकर यांनी सांगितले.

पुणे : गहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या तयारीसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटने कंबर कसली असून तयारी जोमात सुरू केली आहे. पुढच्या महिन्यात तीन सामन्यांची ही मालिका पुण्यात होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संपूर्ण मालिकेचे आयोजन पुण्यामध्ये पहिल्यांदाच होत असून महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्‍वामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे, असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे मानद अध्यक्ष विकास काकतकर म्हणाले. हे सामने 23 मार्च, 26 मार्च आणि 28 मार्च रोजी होणार आहेत.

IPL 2021 Auction : क्रिस मॉरिस ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

पुण्यात होणाऱ्या या एकदिवसीय मालिकेसाठीची तयारी जोरदार सुरू असून खेळपट्टी, तसेच आऊटफिल्डकडे  विशेष लक्ष देऊन सज्ज करण्यात येत असल्याचे काकतकर म्हणाले. सलग तीन सामने या मैदानावर होणार असल्याने प्रत्येक सामना हा नव्या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार असल्याचे काकतकर यांनी सांगितले.

IPL 2021 Auction : मॅक्सवेलसाठी कोहलीच्या संघानं मोजली 'विराट' किंमत

प्रेक्षकांच्या उपस्थितीचा निर्णय नंतर स्टेडियममध्ये किती टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीची परवानगी द्यायची आणि त्याबाबतचे निर्णय मार्च महिन्याच्या सुरूवातीला होतील, असा अंदाज आहे. राज्य सरकारच्या योजनेनुसार आणि निर्णयानंतरच स्टेडियमचे तिकिट शुल्क आणि त्याची आसन क्षमता याचा अंदाज घेऊन त्या विषयीची घोषणा करण्यात येणार आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या