...म्हणून कृणाल पांड्या ड्रेसिंग रुममध्ये घेऊन आला होता वडिलांची कपडे

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 25 March 2021

काही महिन्यांपूर्वीच  कृणाल पांड्याचे वडिलांचे ह्रदय  विकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

नवी दिल्‍ली : भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटर कृणाल पांड्याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून वनडेत धमाकेदार पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात कृणाल पांड्याने नाबाद अर्धशतकी खेळी करुन मिळालेल्या संधीच त्याने सोनं करुन दाखवलं. वनडेतील पहिल्या सामन्यात अर्धशकी खेळी केल्यानंतर वडिलांच्या आठवणीमुळे कृणालच नव्हे तर त्याचा छोटा भाऊ हार्दिक पांड्याही भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही महिन्यांपूर्वीच  कृणाल पांड्याचे वडिलांचे ह्रदय  विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. वडिलांच्या निधानाची बातमी मिळाल्यानंतर कृणाल पांड्याने मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा सोडून घरचा रस्ता धरला होता.  

कृणाल पांड्या आपल्या पदार्पणातील सामन्यात वडिलांची टोपी, शूज आणि कपडे घेऊन ड्रेसिंगरुममध्ये आला होता. वडिलांची उणीव भासू नये म्हणून त्याने हा भावनिक निर्णय घेतला होता. खुद्द कृणाल पांड्याने यासंदर्भात खुलासा केलाय. वडिलांची ही कपडे माझ्यासाठी खूप खास असल्याचे त्याने सांगितेल. 16 जानेवारी रोजी माझ्या मॅचवेळी वडील जे कपडे घालणार होते ती कपडे सोबत ठेवल्याची माहिती कृणाल पांड्याने दिली आहे. 

INGvsENG : कृणाल पदार्पण करत आहे वाटलेच नाही : धवन

पांड्या ब्रदर्सच्या यशाची स्क्रिप्ट लिहिणारे हिमांशू पांड्या याचे 16 जानेवारी रोजी निधन झाले. आपल्या लेकांनी क्रिकेट व्हाने दोघांना ब्लू जर्सीत खेळताना पाहणे हे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते सत्यातही उतरले. हार्दिक आणि कृणालच्या यशात त्यांचे मोलाचे योगदान आहे.  

16 जानेवारीला कोणता सामना होता

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेनं देशातील क्रिकेट अनलॉक झाले. या स्पर्धेत बडोदा संघाचे नेतृत्व हे कृणाल पांड्या करत होता. 16 जानेवारीला बडोदा आणि महाराष्ट्र यांच्यात सामना रंगला होता. वडिलांच्या निधनाची वार्ता मिळाल्यामुळे कृणालला स्पर्धा सोडून घरी परतावे लागले होते.. कृणाल पांड्याच्या अनुपस्थितीत त्याच्या संघाने 60 धावांनी मॅच जिंकली होती. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर विजय हजारे ट्रॉफीत कृणाल पांड्या खेळला आणि देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीच्या जोराने त्याने भारतीय वनडे संघात स्थान मिळवले. 
 


​ ​

संबंधित बातम्या