INDvsENG : क्रुणालनं अश्रू आवरुन वडिलांना समर्पित केलं अर्धशतक (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 23 March 2021

अर्धशतकानंतर अश्रू रोखून स्वत:ला सावरले. अर्धशतकी खेळी वडिलांना समर्पित करत असल्याचेही तो म्हणाला.  

इंग्लंड (England) विरुद्ध पुण्याच्या मैदानात रंगलेल्या  पहिल्या वनडे सामन्यात क्रुणाल पांड्याने पदार्पणातच धमाका केला. वादळी अर्धशतकी खेळीसह आपल्याला मिळालेल्या संधीच सोन करुन दाखवत त्याने लक्ष वेधून घेतले. 31 चेंडूत 58 धावांची नाबाद खेळी त्याने आपल्या वडिलांना समर्पित केली. वनडे पदार्पणातील आपल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीसंदर्भात क्रुणाल म्हणाला की, अर्धशतकानंतर अश्रू रोखून स्वत:ला सावरले. अर्धशतकी खेळी वडिलांना समर्पित करत असल्याचेही तो म्हणाला.  

IND vs ENG, 1st ODI: पुण्याच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगोयोग!

आपल्या मोठ्या भावाने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकवल्याचा आनंद हार्दिक पांड्याने टाळ्या वाजवून केला. यावेळी तो भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. हार्दिक पांड्या पॅव्हिलियनमध्ये आपले डोळे पुसताना दिसला. सूर्यकुमारने त्याची पाठ थोपटत त्याला सावरल्याचेही दिसले. याशिवाय कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकांच्या गळ्यात पडल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

INDvsENG : अशक्य ते शक्य करणारा कृष्णा; 'प्रसिद्ध' तर होणारच

क्रुणाला वनडे पदार्पणाची कॅपही त्याच्या छोटा भाऊ असलेल्या हार्दिक पांड्याच्या हस्तेच देण्यात आली होती. यावेळीही दोघही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. क्रुणाल पांड्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये झालेली निवड योग्य असल्याचे दाखवून देत 31 चेंडूत 58 धावांची नाबाद खेळी केली. त्याने लोकेश राहुलसोबत केलेल्या शतकी भागीदारीमुळेच टीम इंडियाने 317 धावांपर्यंत मजल मारली. क्रुणाल पांड्याने मैदानात उतरल्यानंतर आपण आक्रमक अंदाजत खेळण्याचे संकेत दिले. त्याने मैदानात उतरल्यानंतर सॅम कुरेनच्या एका षटकात तीन चौकार खेचून दमदार खेळी करण्याचे संकेत दिले. आणि अर्धशतकी खेळी करुन नाबाद परतला.   
 


​ ​

संबंधित बातम्या