INDvsENG : टीव्ही पंचांकडून पूर्ण रिप्ले न पाहताच निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 February 2021

चेंडू रहाणेच्या पॅडला लागल्यानंतर तो ग्लोजला लागून शॉर्टलेगला पॉपने झेलला होता.

चेन्नई : मैदानात नाट्यमय घडामोडी घडत असताना मैदानावरील पंचांकडून चुका होण्याची शक्‍यता असते; पण आज दूरचित्रवाणी पंच अनिल चौधरी यांनी घाईने निर्णय देताना चूक केली. अखेर त्याची भरपाई म्हणून इंग्लंडला रिव्ह्यू कायम ठेवण्यात आला.

अजिंक्‍य रहाणेचा झेल शॉर्टलेगला टिपल्याचे अपील करण्यात आले. मैदानावरील पंचांनी ते फेटाळले. त्यानंतर इंग्लंडने रिव्ह्यू घेतला; पण त्यात चेंडू त्याच्या पॅडला लागल्याचे रिप्लेमध्ये दिसून येताच चौधरी यांनी रहाणेला नाबाद ठरवले; परंतु त्यांनी पायचीतचा अँगल तपासला नाही. इंग्लंडकडून याबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा पुन्हा त्यांनी पायचीतचा अँगल तपासला; पण त्या वेळीही रहाणे नाबाद ठरला.

INDvsENG : टीम इंडिला रोहितच्या शतकाची साथ; रितिकासह प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर फुलवलं हास्य

या दोन घटना घडूनही त्याचे नाट्य संपले नव्हते. चेंडू रहाणेच्या पॅडला लागल्यानंतर तो ग्लोजला लागून शॉर्टलेगला पॉपने झेलला होता. ज्यो रूट हे सांगण्याचा प्रयत्न करत होता; परंतु टीव्ही पंचांनी त्या क्षणाचा पूर्ण रिप्ले न पाहताच निर्णय दिला होता. खेळ सुरू झाला होता आणि त्यांच्या लक्षात ही चूक आली. आता रहाणेला बाद ठरवू शकत नाही; परंतु भरपाई म्हणून त्यांनी इंग्लंडने गमावलेला रिव्ह्यू त्यांना पुन्हा दिला. रहाणेला मिळालेले हे जीवदान महागात पडले नाही. पुढच्याच षटकांत रहाणे बाद झाला.
 


​ ​

संबंधित बातम्या